मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे. आज दिवसभरात राज्यात 17 हजार 433 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. तर 292 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना रुग्णांची संख्या सतत वाढत असताना रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही वाढत आहे. आज एका दिवसात राज्यात 13 हजार 959 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 8 लाख 25 हजार 739 इतकी झाली आहे. त्यापैकी 2 लाख 1 हजार 703 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 


राज्यात 5 लाख 98 हजार 496 जण कोरोनातून बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 72.48 टक्के इतकं आहे. 



राज्यात आतापर्यंत 25 हजार 195 जण कोरोनामुळे दगावले आहेत. तर राज्यातील मृत्यूदर 3.5 टक्के एवढा आहे. 


सध्या राज्यात 14 लाख 4 हजार 213 जण होम क्वारंटाईनमध्ये आहे. तर 36 हजार 785 जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.