मुंबई : Maharashtra Political Crisis : महाराष्ट्राच्या राजकीय गदारोळात एक मोठी बातमी समोर येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊ शकतात. त्याचबरोबर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होऊ शकतात. एकनाथ शिंदे गोव्यातून मुंबईत दाखल झाले आहेत. ते फडणवीस यांच्यासोबत राज्यपालांची भेट घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकनाथ शिंदे मुंबईत दाखल झाले. यावेळी मंगल प्रभात लोढा, प्रसाद लाड हे एकनाथ शिंदे यांना घेण्यासाठी मुंबई विमानतळावर आले होते. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्याचवेळी त्यांनी विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आज बंडखोर आमदार मुंबईला जाणार असल्याचे वृत्त होते. मात्र, एकनाथ शिंदेच हेच मुंबईत आले आहेत. बाकीचे बंडखोर आमदार गोव्यातच राहणार आहेत. दरम्यान, महाराष्ट्राच्या विधानसभेच्या इमारतीभोवती सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.


महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उद्धव ठाकरेंना पत्र लिहून बहुमत सिद्ध करण्याची विनंती केली होती, मात्र फ्लोअर टेस्टपूर्वीच उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ठाकरे सरकारला 30 जून रोजी बहुमत सिद्ध करण्यास सांगितले होते.