मुंबई : ज्याची भिती होती अखेर तेच झालं आहे. राज्यात (Maharashtra Guideline) आजपासून नवी नियमावली लागू करण्यात आली आहे. त्यानुसार आज मध्यरात्रीपासून राज्यात जमावबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रात्री 9 ते सकाळी 6 पर्यंत ही जमावबंदी असणार आहे. संसदीय कार्य मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी याबाबतची माहिती दिली. मध्य रात्रीपासून या निर्बंधांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.  (Maharashtra state goverment announced new guidelines over to corona varient omicrone curfew from 9 pm to 6 am says Parliamentary Affairs Minister Anil Parab)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनासह ओमायक्रॉनचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळत आहेत. त्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्बंधामुळे आता राज्यात रात्री 9 ते सकाळी 6 पर्यंत 5 पेक्षा अधिक लोकांना एकत्र येता येणार नाही.    


असे आहेत निर्बंध


जास्त क्षमतेने सभागृह, क्रीडा स्पर्धा आणि लग्न सोहळे आयोजित करता येणार नाही.


उपहारगृहे थिएटर, नाट्यगृहांमध्ये केवळ एकूण क्षमतेच्या 50 टक्के लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी. 


या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीस 500 तर आयोजकांवर 50 हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली जाईल.