मुंबई :  छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेची म्हणजेच शेतकरी कर्जमाफीची व्याप्ती राज्य सरकारने वाढवली आहे. २००१ ते २००९ काळातील थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांसाठी ही योजना लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने मंत्रीमंडळ बैठकीत घेतला.


४ लाख शेतकऱ्यांना होणार फायदा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली. या आधी शेतकरी कर्जमाफी ही २००९ ते २०१७ या कालावधीत कर्ज घेतलेल्या शेतक-यांसाठी लागू होती. सरकारच्या नव्या घोषणेमुळे थेट ४ लाखांपेक्षा जास्त शेतक-यांना फायदा होणार असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला आहे.


इमू पालक शेतकऱ्यांनाही फायदा


दरम्यान, गेल्या काही वर्षात इमू पालन मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी केले होते. तेव्हा या इमू पालन केलेल्या शेतकऱ्यांनाही या कर्जमाफी प्रक्रियेत समाविष्ट करुन घेण्याचा निर्णय राज्य सरकारने मंत्रीमंडळ बैठकीत घेतल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती प्रसारमाध्यमांना दिली. यामुळे थेट 4 लाखापेक्षा जास्त शेतक-यांना याचा फायदा होणार असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला आहे.