Msrtc Conductor Recruitment | एसटी संपाचा फटका, महामंडळाकडून भरतीची घोषणा?
एसटी महामंडळाच्या (Msrtc) विलीनीकरणाच्या मागणीवरुन गेल्या काही महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा (St Strike) संप सुरु आहे.
मुंबई : एसटी महामंडळाच्या (Msrtc) विलीनीकरणाच्या मागणीवरुन गेल्या काही महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा (St Strike) संप सुरु आहे. महामंडळाने दिलेल्या ताकीदीनंतर काही कर्मचारी सेवेत पुन्हा रुजु झाले. मात्र बहुतांश कर्मचारी हे संपाच्या भूमिकेवर ठाम आहेत. एसटी ग्रामीण भागाची जीवनवाहिनी आहे. मात्र कर्मचारी संपावर असल्याने प्रवाशांची गैरसोय होते. सर्वसामन्य प्रवाशांची ही गैरसोय टाळण्यासाठी एसटी प्रशासना मोठा निर्णय घेऊ शकते. (maharashtra state road trasport corporation might be recrutment conductor on contract based)
एसटी प्रशासनाने वाहकांची भरती करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. ही संपूर्ण भरती प्रक्रिया ट्रॉयमॅक्स कंपनीकडून राबवण्यात येणार आहे. वेळोवेळी विनवणी आणि आवाहन करुनही संपकरी कर्मचारी नोकरीवर परतत नाहीयेत. त्यामुळे महामंडळ हा निर्णय घेऊ शकते. ही वाहक भरती कंत्राटी स्वरुपाची असू शकते.
एसटीकडे एकूण 82 हजार 489 कर्मचारी आहेत. त्यापैकी आतापर्यंत फक्त 27 हजार 985 कर्मचारी हे सेवेत रुजु झाले आहेत. मात्र उर्वरित कर्मचारी हे अजूनही संपावर ठाम आहेत.
या संपकरी कर्मचाऱ्यांमध्ये 20 हजार 280 वाहक संपात सक्रीय आहे. वाहक हा एसटी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा प्रमुख भाग आहे. वाहकाशिवाय एसटी प्रवाश शक्य नाही. सध्या वाहक अपुरे पडतायेत. त्यामुळे प्रशासन वाहक भरतीचा निर्णय घेऊ शकते.
दरम्यान, राज्य सरकार मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या मुदतवाढीनतंर एसटी विलीनीकरणाचा त्रिसदस्यीय समितीचा अहवाल 18 फेब्रुवारीला सादर करणार आहे. तर 22 फेब्रुवारीला न्यायालयत सुनावणी होणार आहे.