मुंबई : राज्य सरकारचा (Maharashtra Government) गोंधळी कारभार सुरु आहे. राज्य सरकारच्या परीक्षा परिषदेकडून घेण्यात येणाऱ्या टीईटीच्या (Maharashtra Teacher Eligibility Test 2021) परीक्षेच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे. त्यानुसार आता ही परीक्षा 30 ऑक्टोबरला पार पडणार आहे. आरोग्य विभागाच्या ड श्रेणीसाठीची परीक्षा ही 31 ऑक्टोबरला होणार आहे. त्यामुळे हा टीईटीच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे. शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे. (Maharashtra Teacher Eligibility Test 2021 held be on 30 october due to health department exam on 31 october)  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याआधी टीईटीच्या परीक्षेचं आयोजन हे 10 ऑक्टोबरला करण्याच्या हिशोबाने हालचाली सुरु होत्या. मात्र त्याच तारखेला काही विद्यार्थ्यांची यूपीएससीची (UPSC) परीक्षा होणार आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना टीईटीच्या परीक्षेला मुकावं लागू नये, यासाठी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला गेला. 


असं आहे टीईटीचं वेळापत्रक


टीईटी - I,  सकाळी 10.30 ते दुपारी 1 वाजेपर्यंत, 30 ऑक्टोबर 2021
टीईटी - II, दुपारी 2 ते 4.30, 30 ऑक्टोबर 2021