कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई : शिंदे गट (Shinde Group) रोज शिवसेना (Shiv Sena) खिळखिळी करुन ठेवतोय. शिवसेनेच्या अस्तित्वाची लढाई सुप्रीम कोर्ट (Supreme Court) आणि निवडणूक आयोगात (Election Commission) आहे.  त्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आपल्या भात्यातलं तेजस अस्त्र काढायच्या तयारीत आहेत. तेजस उद्धव ठाकरे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे कनिष्ठ चिरंजीव आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंचे (Aditya Thackeray) धाकटे बंधू. ठाकरेंसाठी ऑक्सिजन समजल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीतच तेजस ठाकरेंची (Tejas Thackeray) राजकारणात एंट्री होऊ शकते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता या चर्चा रंगण्यामागे कारण ठरलंय ते मुंबईच्या गिरगावमध्ये शिवसैनिकांनी लावलेली पोस्टर्स.. (Hordings) 'तेजस उद्धव साहेब ठाकरे' असं लिहिलेलं पोस्टर गिरगावात झळकलंय. "आजची शांतता... उद्याचं वादळ... नाव लक्षात ठेवा तेजस उद्धव साहेब ठाकरे' असं या बॅनरवर लिहिलंय. 


तेजस ठाकरे. बाळासाहेबांचे नातू आणि शिवसेनेच्या सत्तासंघर्षाचे प्रत्यक्ष साक्षीदार. राजकारणाचं बाळकडू त्यांना जन्मतःच लाभलंय. ठाकरे ब्रँडचं वलय बालपणापासूनच त्यांच्याभोवती आहे. 10 वर्षांपूर्वी बाळासाहेबांनीच तेजस ठाकरेंची ओळख करुन दिली होती. पण काही मोजक्या राजकीय घटना वगळल्या तर तेजस ठाकरे नेहमीच राजकारणापासून दूर राहिलेत...


तेजस ठाकरे करतात तरी काय? 









'ठाकरे कुटुंबाचे व्हिव्हियन रिचर्डस्' अशा शब्दांत मिलिंद नार्वेकर यांनी तेजस ठाकरेंचा उल्लेख केला होता. दहीहंडी उत्सवाच्या वेळीही ठाकरे गटाच्या बॅनर्सवर तेजस ठाकरे यांचे फोटो दिसले होते. लाँचिंग मात्र झालेलं नव्हतं. मुंबई महापालिका निवडणूक ठाकरे ब्रँडच्या अस्तित्वाची सर्वात मोठी लढाई आहे. त्यामुळेच महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे आपल्या भात्यातलं तेजस अस्त्र काढण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे, हे तेजसअस्त्र ठाकरेंना उभारी देईल का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.