Vidhan Sabha Election 2024 : मुंबई कोणाची? `या` जागांवर होणार अदलाबदली? मविआतून मोठी बातमी समोर
Vidhan Sabha Election 2024 : मुंबई पुन्हा राजकीय भूकंप, हेवेदावे की सामंजस्यानं सुटणार प्रश्न? आजचा दिवस इतका महत्त्वाचा का? संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष इथंच....
Vidhan Sabha Election 2024 : विधानसभा निवडणुकीआधी सध्या राज्यातील मोठ्या पक्षांसह लहान पक्षसुद्धा तयारीला लागले आहेत. मागील काही वर्षांमध्ये सातत्यानं राज्यातील राजकीय समीकरणांमध्ये बदल होत असतानाच आता पुन्हा एकदा मुंबई कोणाची? कोणाला नेमक्या किती जागा मिळणार या मुद्द्यावरून राजकीय समीकरणं आणि आकडेमोडीला वेग आल्याचं पाहायला मिळत आहे. (Mumbai Vidhan Sabha Election 2024)
इथं महायुती शक्य त्या सर्व मार्गांनी मतदारांचं लक्ष वेधण्यात व्यग्र असतानचा तिथं मुंबई विधानसभेच्या 36 जागांसाठी मविआमध्ये कमालीची रस्सीखेच दिसून येत आहे. सोमवारी त्यासाठी महाविकास आघाडीची बैठकही पार पडणार असून, इथं महत्त्वाची सूत्र निर्धारित केली जाणार आहेत. ज्यामुळं मुंबई शहरात येत्या काळात नेमकी मतांची विभागणी कशी असेल आणि कोणत्या पक्षाला अधिक महत्त्वं मिळणार हे अधिक स्पष्ट होणार आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार सध्या मुंबईत 36 जागांपैकी 20 ते 22 जागांसाठी ठाकरे सेना आग्रही असल्याचं म्हटलं जात आहे. तर, दुसरीकडे काँग्रेस 13 ते 15 तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने 5 ते 7 जागांवर दावा सांगितल्याची माहितीही समोर येत आहे. मुंबईत शिवसेनाच मोठा भाऊ असेल असं वक्तव्य खुद्द जीतेंद्र आव्हाडांनी केल्यामुळं काही गोष्टी स्पष्ट झाल्याच आहेत. पण, मुंबईतल्या जागावाटपात चांदिवली आणि वांद्रे पूर्व या जागांची अदलाबदल होण्याची शक्यता आहे.
हेसुद्धा वाचा : Maharashtra Weather News : ऑरेंज, यलो, रेड...; राज्यात सर्वत्र पावसाचे अलर्ट जारी, कुठं परिस्थिती धडकी भरवणार?
चांदिवलीतून शिवसेनेकडून दिलीप लांडे निवडून आले होते, मात्र ते नंतर शिंदे सेनेसोबत गेले. तेव्हा चांदिवलीच्या जागेवर नसीम खान लढण्याची शक्यता आहे. दुसरीकडे वांद्रे पूर्वचे काँग्रेसचे विद्यमान आमदार झिशान सिद्दीकी अजित पवारांसोबत जाण्याची स्पष्ट शक्यता आहे. त्यामुळे या मतदार संघातून ठाकरे सेनेचे वरुण सरदेसाई निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. प्रत्यक्षात या जागांवर एकाहून अधिक पक्षांचा दावा असल्यामुळं आता त्यावर नेमका तोडगा काय आणि कसा निघणार हे पाहण महत्त्वाचं ठरेल.
कोणत्या पक्षाला हव्यात किती जागा?
सूत्रांच्या माहितीनुसार मुंबईतील 36 पैकी शिवसेना ठाकरे गट 20 ते 22 जागांसाठी आग्रही, तर, शरद पवार गटाचा शहरातील 5 ते 7 जागांवर जावा. काँग्रेस 13 ते 15 जागांवर आग्रही असून, आता या गणिताचं नेमकं उत्तर काय आणि कोणत्या सूत्रांचा वापर करून शोधलं जाईल हे पाहणं महत्त्वाचं.