Maharashtra Assembly Election 2024 : काँग्रेस पक्षाची आज दिल्लीत महत्वाची बैठक पार पडली. जागावाटपाच्या फॉर्म्युल्यावर (Seat Sharing Formula) या स्क्रिनिंग कमिटीच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. या बैठीत महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) जागा वाटपाचा नवा फॉर्म्युला ठरवण्यात आला. नव्या फॉर्म्युल्यानुसार महाविकास आघाडीत तिन्ही पक्ष प्रत्येकी 90 जागा लढवणार आहे. म्हणजे काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष एकूण 270 जागा लढवणार आहेत. तर उर्वरित अठरा जागा मित्रपक्षांसाठी सोडण्यात आलेल्या आहेत. बैठक संपल्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी ही माहिती दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर दिल्लीतील काँग्रेस पक्षाच्या बैठकीमध्ये 55 जागांवर चर्चा झाल्याची माहिती, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. महाविकास आघाडीत एकमत झालेलं नाही अशा 5 ते 7 जागा आहेत. त्या जागांवर मैत्रीपूर्ण लढती होणार का याचा निर्णय अजून झालेला नसल्याचं त्यांनी सांगितलं. 


महाविकास आघाडीचे जागा वाटपाचे गणित चुकले ?
याआधी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी 85 + 85 + 85 जागांचा फॉर्म्युला सांगितला होता. पण 85 + 85 + 85 एकूण 255 होतात. मात्र संजय राऊत आणि नाना पटोले यांनी महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर 85 + 85 + 85अशा एकूण 270 जागांचे जागावाटप झाल्याचे गणित सांगितले. तसेच २७० जागांनुसार उर्वरित 18 जागा इतर पक्षांना असल्याचे देखील नमूद केले. मग 85 + 85 + 85 आणि इतर पक्षांच्या 18 जागा अशा जर पकडल्या तर एकूण 273 जागा होतात.मग उर्वरित 15 जागांचे काय?? या 15  जागांवर तिढा कायम तर नाही ना? अशा शंकांना उधाण आलं होतं.