मुंबई : राज्यात कोरोनाचा फैलाव होत असताना दुसरीकडे कोरोनावर मात करण्यात यश मिळत आहे. कोरोनाशी यशस्वी लढा देऊन बरे झालेल्या रुग्णांच्या संख्येने शुक्रवारी नवा उच्चांक गाठला. एकाच दिवशी ठणठणीत बरे झालेल्या ८३८१ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. विशेष म्हणजे सर्वाधिक ७३५८ रुग्ण मुंबई महापालिका क्षेत्रातील आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण बरे होऊन घरी सोडण्याची ही पहिलीच वेळ आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आतापर्यंत राज्यभरात २६ हजार ९९७ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, काल कोरोनाच्या २६८२ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ३३ हजार १२४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ४ लाख ३३ हजार ५५७ नमुन्यांपैकी ६२ हजार २२८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ५ लाख ३५ हजार ४६७ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ३५ हजार ९६७ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्याचा रुग्ण दुपटीचा वेग मागील आठवड्यात ११ दिवस होता तो आता १५.७ दिवस झाला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ( Recovery Rate ) ४३.३८ टक्के एवढे आहे. राज्यातील मृत्यू दर ३.३७ टक्के आहे.



राज्यात ११६ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद काल झाली आहे . नोंद झालेल्या मृत्यूंपैकी आरोग्य मंडळ निहाय मृत्यू असे : ठाणे- ५८ (मुंबई ३८, ठाणे १, भिवंडी ३, नवी मुंबई ९, रायगड २, मीरा-भायंदर ३, पनवेल १, कल्याण डोंबिवली १), नाशिक- ३२ (जळगाव १७, नाशिक ३, मालेगाव ५, धुळे ७), पुणे- १६ (पुणे मनपा १३,सोलापूर ३), कोल्हापूर-३, औरंगाबाद- ५, अकोला- २ (अमरावती २) आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ७७ पुरुष तर ३९ महिला आहेत. आज नोंद झालेल्या ११६ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ४८  रुग्ण आहेत तर ५५  रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर १३ जण ४० वर्षांखालील आहे. या ११६ रुग्णांपैकी ७५ जणांमध्ये ( ६५ टक्के)  मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता २०९८ झाली आहे.



काल नोंद झालेल्या एकूण मृत्यूपैकी ४६ मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित मृत्यू हे १६ मे ते २६ मे या कालावधीतील आहेत. या कालावधीतील ७० मृत्यूंपैकी मुंबई १६, जळगाव- १४, नवी मुंबई -९, धुळे -६, मालेगाव -५ , औरंगाबाद ३, भिवंडी-३, नाशिक -३ , अमरावती -२ , कोल्हापूर -२, मीरा भाईंदर -२ , रायगड -२ , सोलापूर -२ आणि १ मृत्यू ठाणे येथील आहे.


मुंबई महानगरपालिका: बाधित रुग्ण- (३६,९३२), बरे झालेले रुग्ण- (१६,००८), मृत्यू- (११७३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(६), ॲक्टिव रुग्ण- (१९,७४५)


ठाणे: बाधित रुग्ण- (८६३८), बरे झालेले रुग्ण- (२७२९), मृत्यू- (१७२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (५७३७)


पालघर: बाधित रुग्ण- (९१३), बरे झालेले रुग्ण- (२८०), मृत्यू- (२३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (६१०)


रायगड: बाधित रुग्ण- (९९९), बरे झालेले रुग्ण- (५१८), मृत्यू- (२९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव रुग्ण- (४५०)


नाशिक: बाधित रुग्ण- (१०७०), बरे झालेले रुग्ण- (८१८), मृत्यू- (६०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (१९२)


अहमदनगर: बाधित रुग्ण- (९६), बरे झालेले रुग्ण- (५२), मृत्यू- (६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (३८)


धुळे: बाधित रुग्ण- (१३५), बरे झालेले रुग्ण- (७०), मृत्यू- (१६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (४९)


जळगाव: बाधित रुग्ण- (५५५), बरे झालेले रुग्ण- (२६३), मृत्यू- (६९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (२२३)


नंदूरबार: बाधित रुग्ण- (३३), बरे झालेले रुग्ण- (२०), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (१०)


पुणे: बाधित रुग्ण- (७२२३), बरे झालेले रुग्ण- (३४२५), मृत्यू- (३१४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (३४८४)


सोलापूर: बाधित रुग्ण- (७६९), बरे झालेले रुग्ण- (३१४), मृत्यू- (६२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (३९३)


सातारा:  बाधित रुग्ण- (४५९), बरे झालेले रुग्ण- (१४५), मृत्यू- (१६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (२९८)


कोल्हापूर: बाधित रुग्ण- (३७९), बरे झालेले रुग्ण- (८७), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (२८८)


सांगली: बाधित रुग्ण- (१०४), बरे झालेले रुग्ण- (५३), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (५०)


सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (२१), बरे झालेले रुग्ण- (७), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (१४)


रत्नागिरी:  बाधित रुग्ण- (२१६), बरे झालेले रुग्ण- (८८), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (१२३)


औरंगाबाद: बाधित रुग्ण- (१४१०), बरे झालेले रुग्ण- (९५९), मृत्यू- (६५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (३८६)


जालना: बाधित रुग्ण- (११७), बरे झालेले रुग्ण- (३२), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (८५)


हिंगोली: बाधित रुग्ण- (१४३), बरे झालेले रुग्ण- (९७), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (४६)


परभणी: बाधित रुग्ण- (४२), बरे झालेले रुग्ण- (१), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (४०)


लातूर: बाधित रुग्ण- (१०८), बरे झालेले रुग्ण- (५२), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (५३)


उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (६४), बरे झालेले रुग्ण- (१३), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (५१)


बीड: बाधित रुग्ण- (४६), बरे झालेले रुग्ण- (५), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव रुग्ण- (४१)


नांदेड: बाधित रुग्ण- (१०८), बरे झालेले रुग्ण- (८२), मृत्यू- (६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (२०)


अकोला: बाधित रुग्ण- (५३७), बरे झालेले रुग्ण- (२७५), मृत्यू- (२८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव रुग्ण- (२३३)


अमरावती: बाधित रुग्ण- (२०२), बरे झालेले रुग्ण- (११७), मृत्यू- (१६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (६९)


यवतमाळ: बाधित रुग्ण- (१२८), बरे झालेले रुग्ण- (९२), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (३६)


बुलढाणा: बाधित रुग्ण- (५६), बरे झालेले रुग्ण- (२९), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (२४)


वाशिम: बाधित रुग्ण- (८), बरे झालेले रुग्ण- (६), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (२)


नागपूर: बाधित रुग्ण- (५११), बरे झालेले रुग्ण- (३४२), मृत्यू- (९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (१६०)


वर्धा: बाधित रुग्ण- (११), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (१०)


भंडारा: बाधित रुग्ण- (२५), बरे झालेले रुग्ण- (१), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (२४)


गोंदिया: बाधित रुग्ण- (५८), बरे झालेले रुग्ण- (३), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (५५)


चंद्रपूर:  बाधित रुग्ण- (२५), बरे झालेले रुग्ण- (९), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (१६)


गडचिरोली: बाधित रुग्ण- (३१), बरे झालेले रुग्ण- (५), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (२६)