Maharashtra Politics : राज्यातील उद्योग गेल्या काही काळात गुजरातला जात असल्याचा आरोप केला जात आहे. महाराष्ट्रातील उद्योग, वित्तीय संस्था केंद्र आणि महत्त्वाची कार्यालये गुजरातला (Gujrat) पळवली जात असल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने केला जातोय. आता आणखी एक प्रकल्प गुजरातला गेल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. नागपूरमध्ये सोलर पॅनल प्रकल्प (Solar Panel Project) येणार होता. या प्रकल्पा अंतर्गत 18 हजार कोटींची गुंतवणूक होणार होती. राजकीय आणि प्रशासकीय उदासीनतेमुळे हे प्रकल्प राज्याबाहेर गेल्याचा आरोप विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केला आहे. वेदांत-फॉक्सकॉन, टाटा-एअरबस विमान प्रकल्प आणि आता सोलर पॅनल प्रकल्प गुजरातमध्ये जाणार असल्याची माहिती आहे. निरर्थक उद्योग करणारे नेते महायुतीत असल्यानं असल्यानं उद्योग राज्याबाहेर जात असल्याचा आरोप वडेट्टीवारांनी केलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिंदू - मुस्लिम, जीभ कापा- जीभेला चटके द्या, पक्ष फोडा- आमदार पळवा... सतत असे निरर्थक उद्योग करणारे महायुती सरकार महाराष्ट्रात असल्यामुळे जगभरातील कॉर्पोरेट कंपन्या आणि उद्योगांना राज्यात उद्योग करणे कठीण झाले आहे. अधिकारी मंत्र्यांना खुश करण्यात व्यस्त आहे. मंत्र्यांची मस्ती, आमदारांचे नको ते लाड यामुळे महाराष्ट्राची पिछेहाट होत आहे आणि राज्यातील तरुणांचे रोजगार हिरावले जात असल्याचं विजय वडेट्टीवारांनी म्हटलंय.



रिन्यू कंपनीने जारी केला खुलासा


विरोधकांनी आरोप केल्यानतंर रिन्यू कंपनीने खुलासा जारी केला आहे. महाराष्ट्र सरकारशी चर्चा अपूर्ण राहिल्याने किंवा वीज दर प्रचंड असल्याने महाराष्ट्रात गुंतवणूक करणार नाही, असे आम्ही म्हटल्याचे वृत्त धादांत खोटे आहे. हे वृत्त नुसते दिशाभूल करणारे नाही, तर अतिशय बेजबाबदारपणाचं असल्याचं कंपनीने म्हटलं आहे.