मुंबई :  शिवसेनेतील अंतर्गत दुफळीमुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले आहे. शिवसेना शिंदे गट आणि भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकार अस्तित्वात आले. आज या सरकारवने विधीमंडळात विश्वासदर्शक ठराव जिंकला. या ठरावाच्या मतदानावेळी काही कॉग्रेस आणि राष्ट्रवादीचे 7-8 आमदार अनुपस्थित राहिले त्याबाबत उमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अदृश्य हातांचे आभार मानले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कॉग्रेस - एनसीपी पक्षाचे 
संग्राम जगताप, 
अशोक चव्हाण,
विजय वड्डेटीवार, 
अण्णा बनसोडे, 
दत्ता भरणे ( आई निघन यामुळे आले नाही ) 
झिसान सिद्धिकी, 
धीरज देशमुख
प्रणिती शिंदे



शिंदे सरकारने बहुमताचा आकडा पार करून विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. या बहुमत चाचणीवेळी महाविकास आघाडीला आणखी एक धक्का बसला. राष्ट्रवादीचे 7-8 आमदार बहुमत चाचणीसाठी सभागृहात प्रवेश करू शकले नाहीत.


बहुमत सिद्ध करण्याची वेळ असताना आमदारांना उशीर झाला. उशीर झाल्याने दरवाजे बंद करण्यात आले आणि त्यांना प्रवेश नाकारला गेला. इतका महत्त्वाचा दिवस असूनही महाविकास आघाडीच्या आमदारांना गांभिर्य नाही का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.