मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी भाजपने महाविकासआघाडीवर जोरदार टीका केली आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी महाविकासआघाडीचं हे सरकार म्हणजे स्थगिती सरकार आहे. आदित्य ठाकरेंनी लग्नाचा प्रस्ताव दिला तरी त्यालाही स्थगिती मिळेल, असा टोला सुधीर मुनगंटीवार यांनी हाणला आहे. अब की बार बाप बेटे की सरकार, असंही सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'उद्धव ठाकरे मोदींकडून सीएए आणि एनपीआर समजून घेतात. तुमच्या उजव्या आणि डाव्या बाजूला बसणाऱ्यांनाही समजवा', असं सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं. सुधीर मुनगंटीवार वनमंत्री असताना झालेल्या वृक्षारोपणाच्या चौकशीची मागणी करण्यात आली आहे. तुमच्या चौकशीला घाबरत नाही, ७ पिढ्या चौकशी करा, असं आव्हान मुनगंटीवार यांनी दिलं.


'मागचं सरकार हे फक्त फडणवीसांचं नव्हतं, शिवसेनेचं होतं. मागच्या सरकारमध्ये शिवसेना मिस्टर इंडिया नव्हती. शिवसेना आता सोनिया सेना झाली आहे,' अशी टीका सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. 


हिंगणघाटमधील मुलीला भेटायला आमचे गृहमंत्री कधी गेले? असा प्रश्न मुनगंटीवार यांनी विचारला आहे. सत्ता येईल जाईल, आम्ही चिंता करत नाही, आम्ही सत्याची चिंता करतो, असं वक्तव्य मुनगंटीवार यांनी केलं.