मुंबई : महागाईच्या भडक्यात ग्राहकांना वीज दरवाढीचा शॉक बसण्याची शक्यता आहे. महावितरण कंपनीनं पुढील पाच वर्षांसाठी वीज दरवाढीचा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडे पाठवलाय. सरासरी पाच ते सात टक्के वीज दरवाढीचा प्रस्ताव असला तरी २० टक्के दरवाढीचा प्रस्तार असल्याचं उघड झालंय. या प्रस्तावाला नियामक आयोगानं मंजुरी दिल्यास ग्राहकांना वीज वापरासाठी जादा पैसे मोजावे लागणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महावितरणनं तब्बल सहा हजार कोटींच्या दरवाढीचा हा प्रस्ताव पाठवलाय. या दरवाढीचा सर्वात जास्त फटका घरगुती वीज वापरणाऱ्या ग्राहकांना बसणार आहे. कारण ३०० युनिटपर्यंतच्या वापराला दरवाढीचा प्रस्ताव सुचवण्या आलाय.


मात्र, ३०० युनिटपेक्षा जास्त वापर करणाऱ्या ग्राहकांना दरवाढीच्या प्रस्तावातून महावितरणनं वगळलंय. त्यामुळे बड्यांना दिलासा मिळणार असून सामान्य ग्राहकांना मात्र मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.



२०२० ते २०२५ अशा पाच वर्षांसाठी महावितरणाने १३ जानेवारी रोजी महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडे हा प्रस्ताव मांडलाय. महावितरणाच्या या प्रस्तावावर ग्राहकांकडून सूचना आणि हरकती मागवण्याचे निर्देशही आयोगानं दिलेत. नागरिकांनी ४ फेब्रुवारीपर्यंत आपल्या सूचना आणि हरकती आयोगाच्या कफ परेड इथल्या वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या कार्यालयात धाडण्याचं आवाहन करण्यात आलंय. संपूर्ण राज्यात वीज पुरवठा करण्याची जबाबदारी महावितरणकडे आहे. यात मुंबईतल्या भांडुप आणि मुलुंडचाही समावेश आहे.