मुंबई : राज ठाकरे यांच्या मुलुंड येथील सभेतील महत्त्वाचे मुद्दे
आपल्या भाषणात राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही रडारवर घेतले.
मुंबई : मुलूंड येथील सभेत राज ठाकरे यांनी आज (रविवार) केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. आपल्या भाषणात राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही रडारवर घेतले. पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेत येऊन साडेचार वर्षे उलटल्यावरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर का आठवले असे त्यांनी विचारतानाच राज्याचे मुख्यमंत्री चक्क खोटं बोलतात असे राज ठाकरे म्हणाले. दरम्यान, आपल्या खास शैलीत राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची नक्कलही केली. आपल्या भाषणात काय म्हणाले राज ठाकरे?
राज ठाकरे यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे
येत्या काही काळात महाराष्ट्राचे वाळवंट होईल: राज ठाकरे
मराठी माणसाच्या हितासाठी हा राज ठाकरे कोणताही त्रास सहन करायला तयार आहे - राज ठाकरे
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री खोटं बोलतात - राज ठाकरे
काही झाले तरी, कोकणात नाणार प्रकल्प होणार नाही म्हणजे नाही. सरकारला काय करायचे ते करू देत - राज ठाकरे
निर्भया प्रकरणी मनमोहन सिंग यांना बांगड्या पाठवणाऱ्या स्मृती इराणी आता गप्प का - राज ठाकरे
गुजरात विधानसभेची निवडणूक संपताच राहुल गांधी यांना पप्पू बोलणारे एकदम गप्प झाले - राज ठाकरे
तब्बल ३० वर्षांनतर देशात बहुमताचे सरकार. पण, पंतप्रधान होण्यापूर्वी माहित नव्हतं नरेंद्र मोदी हा माणूस असा आहे - राज ठाकरे
सत्तेत येऊन साडेचार वर्षे झाल्यावर मोदींना डॉ. बाबासाहेब आठवले. सत्तेत आल्या आल्या शपथ घेताना का सुचलं नाही हे - राज ठाकरे
नरेंद्र मोदी सरकारमध्ये हिंमत असेल तर त्यांनी भारतात घुसलेले बांग्लादेशी, पाकिस्तानी मुसलमान हुसकवून दाखवावेत - राज ठाकरे
देशात सत्ता मिळविण्यासाठी भाजपला हिंदू-मुस्लिम दंगली करायच्या आहेत - राज ठाकरे
सत्तेत असलेले भाजपचे लोक बलात्कार करतात हे पाहून मन अस्वस्थ होते - राज ठाकरे
कोणतीही सत्ता नसताना आपण महिलांना नोकरी देतो आहोत. युती सरकारसारख्या आम्ही थापा मारत नाही - राज ठाकरे