मटका किंग रतन खत्रीचं मुंबईत निधन
मुंबईत राहत्या घरी झालं निधन
मुंबई : भारतात सट्टेबाजीचा दिग्गज मानला जाणारा रतन खत्रीचं मुंबईत निधन झालं आहे. वयाच्या ८८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक दिवसांपासून रतन खत्री याची तब्बेत बिघडली होती. मुंबई सेंट्रलमध्ये असलेल्या नवजीवन सोसायटीमधील आपल्या घरी शेवटचा श्वास घेतला. सिंधी परिवारात खत्री यांचा जन्म झाला. पाकिस्तानच्या कराचीमधून रतन खत्री मुंबईत आला. मुंबईत आला तेव्हा रतन खत्री तरूण होते.
मटका किंगच्या नावाने रतन खत्रीचं नाव होतं. १९६२ सालात मुंबईत सुरू झालेल्या जुगारमध्ये मटका हा प्रकार लोकप्रिय करण्याच श्रेय रतन खत्रीला जातं. यानंतर देशात मटका हा जुगार अतिशय लोकप्रिय झाला आणि त्याचं मोठं रॅकेट निर्माण झालं. यानंतर मटका किंगचं राज्य होतं.
मटकामध्ये न्यूयॉर्क कॉटन एक्सचेंजमध्ये संचारित होणाऱ्या सूताचं ओपनिंग आणि क्लोझिंग रेटवर सट्टेबाजी केली जात असे. १९६० च्या दशकात हे मुंबईच्या प्रत्येक वर्गात लोकप्रिय होतं. खत्रीने सुरूवातीला कल्याणजी भगतसोबत काम केलं. खत्रीने भगतसोबत वरळीच्या मटका मॅनेजरच्या रुपात काम केलं. कालांतराने यांचे मार्ग वेगळे झाले. त्यानंतर रतन खत्रीने रतन मटकाची सुरूवात केली.