मुंबई : पती- पत्नीच्या नात्यात भांडणानं तोंड वर काढल्यानंतर उडणारे खटके अनेकदा विकोपास जातात. यातच एकमेकांचा अपमानही होतो. पण, आता मात्र वादात पत्नीचा अपमान करताना दोनदा विचार करा. कारण, मुंबईतील 35 वर्षीय इसमाकडून पत्नीचा अपमान झाला आणि त्याला थेट कारावासाचीच शिक्षा झाली आहे. (man got punished for insulting his wife court police)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अंधेरीतील एका 35 वर्षीय व्यक्तीला पत्नीवर शारीरिक अत्याचार केल्याचाही आरोप लावण्यात आला आहे. महानगर दंडाधिकारी एसआर सईद यांनी सदर प्रकरणाची महत्त्वाची माहिती दिली. 


कोणत्याही स्त्रीच्या चारित्र्याबद्दल, प्रतिष्ठा आणि स्वाभिमानाबद्दल अपशब्दाचा उच्चारही करणं ही नैतिक चूक असल्याचं म्हणत या प्रकरणातील महिलेला मानसिक त्रासही सहन करावा लागल्याची बाब न्यायालयानं दृष्टीक्षेपात घेतली. 


पत्नीला झालेल्या त्रासासाठी आता आरोपी पतीला 10 हजार रुपये देण्याचे आदेशही न्यायालयाकडून देण्यात आले आहेत. 


पीडितेनं सादर केलेले पुरावे आणि तिला आरोपीकडून मिळालेले अश्लील मेसेज पाहता झालेला मानसिक छळ हाच सर्वात मोठा पुरावा आहे. प्रकरणाला मोठं वळण तेव्हा मिळालं, ज्यावेळी ती आरोपीची दुसरी पत्नी असल्याची बाब समोर आली. 


आरोपी पती, दोन्ही पत्नींसोबत राहत होता. पुढे त्यानं पीडितेवर सेक्स वर्कर असल्याचा आरोप करत तिला अश्लील मेसेजही केले होते. पतीकडून महिलेवर करण्यात आलेले अत्याचार पाहता न्यायालयानं त्याला दिलेली शिक्षा योग्य. पण, वाद विकोपास गेलं असता जोडीदारांनी एकमेकांचा अपमान करणं थांबवणं ही बाब मात्र विसरता कामा नये.