प्रथमेश तावडे झी मीडिया मुंबई: गेल्या काही दिवसांपासून बनावट आयडी तयार करून पैशांची मागणी करत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. आता तर नेते आमदारांच्या नावे आयडी तयार करून पैसे मागण्याचे प्रकार घडत असल्याची धक्कादायक घटना समोर आली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महिला आमदाराच्या नावे पैशांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आला. मीरा भाईंदरच्या आमदार गीता भरत जैन यांच्या नावाने सोशल मीडियावर  बनावट अकाउंट तयार करण्यात आलं. या सोशल मीडिया असून त्याद्वारे चक्क पैश्यांची मागणी केली केल्याचा प्रकार उघडकीस आला. 


या प्रकरणाची गंभीर दखल घेत जैन यांचे स्वीय सहाय्यक राजाराम बरकडे यांनी नवघर पोलीस ठाण्यात तातडीनं तक्रार दाखव केली. फेसबुकचा आधार घेत आरोपीने जैन यांचे व्हाट्सअपवर बनावट अकाउंट तयार केलं. त्यानंतर या अकाऊंटचा वापर करून अज्ञात व्यक्तीनं शहरातील काही नागरिकांकडे पैशांची मागणी केली होती. 


या प्रकरणी काही नागरिकांनी खात्री करण्यासाठी जैन यांना संपर्क केला. त्य़ावेळी हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन तातडीनं तक्रार दाखल केली. नवघर पोलीस ठाण्यात या संदर्भात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. 


या प्रकरणानंतर मोठी खळबळ उडाली. गेल्या काही दिवसांपासून असे अनेक प्रकार समोर येत आहेत. बनावट आयडी तयार करून सोशल मीडियावर पैसे उकळले जात आहेत. त्यामुळे भावनेच्या आहारी न जाता आपण सतर्क राहाणं खूप गरजेचं आहे. सोशल मीडियावर अशा प्रकारे पैशाची मागणी होत असेल तर वेळीच सावध होणं गरजेचं आहे.