Shocking Story : मुंबईतून (Mumbai)एक संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनेत एका महिलेच्या घरासमोर येऊन एका तरूणाने हस्तमैथून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी महिलेने पोलिसात (Police complaint) तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार आरोपी तरूणाला महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे. 


घटनाक्रम काय ? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईच्या (Mumbai)वांद्रे येथील चॅपल रोड परिसरात राहणाऱ्या एका महिलेच्या दाराची बेल वाजली होती. घरात कोण आलंय हे पाहायला गेलेल्या महिलेने दरवाजा उघडताच आरोपीने पँट उघडून हस्तमैथून करायला सुरूवात केली. या घटनेने महिलेला मोठा धक्का बसला व तिने लगेच दार लावून घेतले होते. यामुळे महिला चांगलीच घाबरली होती.यानंतर महिलेने घटनेची माहिती पोलिसांना (Police complaint)दिली होती. पोलीस पथक घटनास्थळी दाखल होण्यापूर्वीचे आरोपीने पळ काढला होता. पोलिसांनी महिलेचा जबाब नोंदवून अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. 


आरोपीच्या मुसक्या आवळल्या


आरोपीचे अश्लील कृत्य सोसायटीच्या कॅमेरात (CCTV Camera) कैद झाले होते. त्यामुळे पोलिसांनी आरोपीची ओळख पटण्यासाठी सीसीटीव्हीचा आधार घेतला होता. यासाठी पोलिसांनी 4-5 सीसीटीव्ही कॅमेरे तपासले होते. मात्र ते कॅमेरे नादूरूस्त असल्याचे आढळून आले.सीसीटीव्हीतून काहीच पुरावा हाती न लागत असल्याचे पाहून पोलिसांनी महिलेद्वारे आरोपीचे स्केच बनवून घेतले.या स्केचद्वारे आरोपीचा शोध सुरू केला. 


दरम्यान आरोपीला त्याच्याविरोधात तक्रार दाखल झाली नसल्याची माहिती होती. त्यामुळे त्याने पुन्हा महिलेचे घर गाठून पुन्हा अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न केला.यावेळी पोलिसांनी (Police) आरोपीला गजाआड केले.अली अहमद सय्यद असे या आरोपीचे नाव आहे. तो एक सेल्समन आहे. त्याची पत्नी त्याला तीन वर्षांपुर्वी सोडून गेली होती, तेव्हापासून तो एकटाच राहत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे.