या मुंबईकराने २२ जळत्या मेणबत्त्या तोंडात धरल्या
दिनेश उपाध्यायने २२ जळत्या मेणबत्या तोंडात ठेवून वेगळाच रेकॉर्ड केला आहे
मुंबई : मुंबईत राहणाऱ्या दिनेश उपाध्यायने २२ जळत्या मेणबत्या तोंडात ठेवून वेगळाच रेकॉर्ड केला आहे. दिनेश एका शाळेत शिक्षक असून त्याने ८९ गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड तसेच ५७ लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्सही बनविल्याचे सांगितले जात आहे.
यावेळेस त्याने २२ जळत्या मेणबत्त्या तोंडात ठेवून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. दिनेशने हा व्हिडिओ फेसबुकवर अपलोड केला.
यावर त्याच्या मित्र मंडळींमध्ये जोरदार चर्चा रंगली आहे. फेसबुकवर लाखो लोकांना हा व्हिडिओ पाहिला असून सगळीकडे एकच चर्चा आहे.
याआधी दिनेश उपाध्यायने एका मिनिटात ७४ द्राक्षे खाण्याचा विक्रम नोंदवला होता. एवढेच नव्हे तर, त्याने एका हातात १० बिलियर्ड बॉल ठेवण्याचा रेकॉर्डही केला आहे.
( आपण असा प्रकार घरी करण्याचा प्रयत्न करु नका असे आम्ही आवाहन करीत आहोत. )