मंजुळा शेट्ये हत्या : केंद्राकडून गंभीर दखल, ३० महिला खासदारांकडून पाहणी
कैदी मंजुळा शेट्ये हत्येप्रकरणानंतर देशभरातल्या ३० महिला खासदार आज भायखळा कारागृह भेटीसाठी दाखल झाल्या आहेत. या हत्येची केंद्र सरकारने गंभीर दखल घेतलेय.
मुंबई : कैदी मंजुळा शेट्ये हत्येप्रकरणानंतर देशभरातल्या ३० महिला खासदार आज भायखळा कारागृह भेटीसाठी दाखल झाल्या आहेत. या हत्येची केंद्र सरकारने गंभीर दखल घेतलेय.
भाजपच्या खासदार माजी मंत्री बीजोया चक्रवर्ती या शिष्टमंडळाच्या प्रमुख आहेत. या भेटीत खासदार ,महिला कैद्यांबरोबर चर्चा करणार आहेत. महिला खासदारांच्या भेटीमुळे मंजुळा शेट्ये हत्याप्रकरणाची केंद्र सरकार गंभीर दखल घेण्याची भीती इथल्या अधिका-यांना असल्याची चर्चा आहे.
भायखळा महिला तुरुंगात वॉर्डन असलेल्या मंजुळा शेटये हिचा जेलर मनीषा पोखरकर आणि महिला कॉन्स्टेबल बिंदू नाईकडे, वसीमा शेख, शीतल शेगावकर, सुरेखा गुळवे, आरती शिंगणे यांच्या मारहाणीत मृत्यू झाला. याप्रकरणी सर्व आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटकही करण्यात आली.
याप्रकरणी तुरुंग प्रशासनाच्या बाजूने तपास करणाऱ्या पोलीस उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांनी आरोपींची बाजू घेतली. यानंतर त्यांना तपासातून हटविण्यात आले. या घटनेनंतर तुरुंगात महिला कैद्यांचा छळ होत असल्याचे विदारक चित्र सर्वांसमोर आले. त्यानंतर केंद्राने दखल घेतली.