IAS अधिकारी म्हैसकर यांच्या मुलाचा गूढ मृत्यू
आयएएस अधिकारी मनीषा म्हैसकर आणि मिलिंद म्हैसकर यांच्या २२ वर्षीय मुलाने आत्महत्या केलीय.
मुंबई : आयएएस अधिकारी मनीषा म्हैसकर आणि मिलिंद म्हैसकर यांच्या २२ वर्षीय मुलाने आत्महत्या केलीय.
मन्मथ मिलिंद म्हैसकर असं त्यांच्या २२ वर्षीय मुलाचे नाव आहे. दरिया महल नेपन्सी रोड, मलबार हिल या इमारतीवरुन सकाळी साडे सातच्या सुमारास मन्मत मिलिंद म्हैसकर याने उडी मारुन आत्महत्या केल्याचं सांगितलं जातंय.
मरीन लाईन्स येथे राहणारा मन्मत सकाळी ७ वाजता आपला मित्र अग्रवाल याला भेटायला जातो असं सांगून मन्मत घरातून निघाला होता. पण, सकाळी ७.३० चा दरम्यान मलबार हील येथील दरिया महल नेपसीन रोड, मलबार हिल, मुंबई या बिल्डिंगवरुन एक तरुण पडल्याची माहिती मलबार हिल पोलीस ठाण्यास मिळाली. पोलीसांनी घटनास्थळी पोहोचून मन्मतचा मृतदेह जे जे हॉस्पिटलला पाठवला.
पण नक्की मन्मतनं आत्महत्या केली का? आत्महत्येमागचं कारण काय? असा प्रश्न अनेकांना पडलाय. त्यामुळे पोलीस तपासात नेमके काय समोर येते त्याकडे सगळयांचे लक्ष लागून आहे.