मुंबई :  मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी विधानसभेत आजही विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये खडाजंगी पाहायला मिळाली. आज विधिमंडळाचा शेवटचा दिवस होता. विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सरकारवर घणाघाती टीका केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'सचिन वाझेंच्या बाबतीत विरोधकांची मागणी आहे की त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, सचिन वाझे असो वा कोणीही सरकार कोणालाही पाठीशी घालणार नाही, सचिन वाझे सध्या क्राईम काम करीत आहेत. तेथून  त्यांना दूसऱ्या विभागात हलवण्यात येणार असल्याची घोषणा मी करीत आहे', असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानसभेत म्हटले.



गृहमंत्री यांच्या उत्तरावर आक्षेप  घेत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर  यांनी म्हटले की, 'सचिन वाझेच्या प्रकरणात सरकारने काय निर्णय घेतला त्याबाबत गृहमंत्र्यांनी काय निर्णय घेतला. मनसुख हिरेनचा खुन झाला आहे. सचिन वाझेवर कारवाई झाली नाही तर, भाजप आंदोलन करणार आहे'. 


'मनसुख हिरेनच्या पत्नीने सचिन वाझे यांच्या गंभीर आरोप केले आहे. पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणात 20 दिवस या सरकारने एफआयआर दाखल केली नव्हती. आता देखील मनसुख हिरेनच्या मृत्यू नंतर त्या संदर्भातील पूरावे नष्ट करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. राज्यात खुलेआम हत्या सुरू आहेत. सचिन वाझे सरकारचा जावाई आहे का'? असा संतापजनक सवालही प्रवीण दरेकर यांनी केली होती.