मुंबई : मराठा समाज हा राज्यकर्ता समाज म्हटला जात होता. मात्र राज्य मागासवर्गीय आयोगाच्या अहवालात अतिशय धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. यामुळे संपूर्ण मराठा समाज राजकीय आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम आहे, असं म्हणणारे आता खोटे ठरणार आहेत. कारण राज्य मागासवर्गीय आयोगाच्या सर्वेत मराठा समाजात माथाडी डबेवाला, हमाल आणि शेतकरी, शेतमजूर यांचा मोठ्या प्रमाणात समावेश असल्याचं समोर आलं आहे.


मागील १० वर्षात झालेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येत किती मराठा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मागील दहा वर्षात शेतकऱ्यांनी केलेल्या आत्महत्येत मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात मराठा समाजाचा सहभाग. ४३ हजार ६२९ कुटूंबाचा सर्वे करण्यात आला. यात या कुटुबांपैकी ३४५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, त्यापैकी २७७ शेतकरी ही मराठा समाजातील आहेत.


मराठा समाजातील ७०.५६ टक्के लोकांकडे कच्ची घरं आहेत. तसेच मराठा समाज हा मोठा जमीनदार मानला जात असला. तरी जमिनीची तुकडे झाल्याने, आता अल्पभूधारकांमध्ये ६२.७४ टक्के शेतकरी आहेत.