मराठा क्रांती मोर्चा मध्ये सहभाग घेण्यापूर्वी जाणून घ्या काय आहे ` पार्कींग व्यवस्था`
9 ऑगस्टला मुंबईत होणारा मराठा क्रांती मोर्चा हा गर्दीचा विक्रम तोडण्याची दाट शक्यता आहे.
मुंबई : 9 ऑगस्टला मुंबईत होणारा मराठा क्रांती मोर्चा हा गर्दीचा विक्रम तोडण्याची दाट शक्यता आहे.
महाराष्ट्रभरातून लोकं या मोर्च्यामध्ये सहभागी होणार असल्याने मुंबईत वाहतुक व्यवस्थेवर ताण पडण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर वाहतुक कोंडीचा त्रास टाळण्यासाठी प्रदेशनिहाय पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. सोबतच काही ठिकाणी पर्यायी रस्ते खुले करण्यात आले आहेत.
नवी मुंबईत हार्बल रेल्वे स्थानकाबाहेरील मोकळ्या ठिकाणी मराठा मोर्चामध्ये सहभागी होणार्यांना आपल्या गाड्या पार्क करून रेल्वेने मुंबईत जाण्याचा मार्ग सुचवला आहे.
सातारा,सांगली,कोल्हापूर - वाशी एपीमसी मार्कट
पुणे,सोलापूर - खारघर रेल्वे स्थानक, सेंट्रल पार्क मैदान
अहमदनगर - खांदेश्वर रेल्वे स्थानक
औरंगाबाद - मानससरोवर कामोठे रेल्वे स्थानक
रायगड, रत्नागिरी,सिंधूदुर्ग - नेरूळ, सीवूड्स रेल्वे स्थानक
बीड - सानपाडा रेल्वे स्थानक
परभणी - वाशी रेल्वेस्थानक
मुंबई- पुणे महामार्गाला लागुनच हार्बर रेल्वेची अनेक स्थानक असल्याने हे अनेकांना सोयीचे ठरणार आहे. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांनीदेखील चोख सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे. सायन पनवेल आणि ठाणे बेलापूर या महामार्गावर मोठा वाहतूक पोलीस फाटा तैनात करण्यात आला आहे. तर रेल्वेने प्रवास करणार्या मोर्चेकर्यांच्या सुरक्षे आणि मदतीसाठी रेल्वे स्थानकाच्या आवारातही पोलिस मदतीला असतील.