मुंबई : मराठा आंदोलनात ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. त्यांच्यावरचे गुन्हे दोन दिवसात मागे घेतले नाहीत तर पोलीस स्टेशनवर मोर्चे काढण्यात येतील, असा इशारा देण्यात आलाय. मराठा क्रांती ठोक मोर्चाची आज आढावा बैठक झाली. आंदोलनाचा दुसरा टप्पा काय  असावा याविषयी बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी हा मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 शिवाय नोव्हेंबरपर्यंत सरकारनं आरक्षणाचा निर्णय घेतला नाही ,तर एक डिसेंबरपासून पुन्हा ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याचं मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय. तर राज्य सरकार मराठा आरक्षणासाठी कटिबद्ध असल्याचं अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारांनी सांगितंलय .


दरम्यान, मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर चक्री उपोषण सुरु करण्यात आलं आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं, या मुख्य मागणीसाठी हे चक्री उपोषण सुरु करण्यात आलं आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळेपंर्यत बेमुदत हे चक्री उपोषण सुरु राहणार आहे. 


आरक्षणाच्या मुख्य मागणीसह इतरही मागण्या उपोषण कर्त्यांकडून करण्यात आल्या आहेत. आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणे, मराठा युवकांना व्यवसायासाठी कर्ज मिळणे. अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. मराठा क्रांती मुक मोर्चाप्रमाणे या आंदोलनासाठी देखील आचारसंहीता ठरवून देण्यात आली आहे.