मुंबईतील मराठा मोर्चाच्या भगव्या वादळाचे दोन फोटो... होताहेत व्हायरल
मराठा क्रांती मूक मोर्चासाठी अभूतपूर्व संख्येने मराठा समाज मुंबईत धडकला. राज्यभरातून मराठा बांधव मंगळवारीच मोठ्या संख्येने मुंबईत दाखल झाले आहेत. मोर्च्यापूर्वी मुंबईतील रस्ते आणि मोर्चा सुरू झाल्यानंतर भगवामय झालेले रस्ते याचे सुंदर फोटो आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी काढले आहे.
मुंबई : मराठा क्रांती मूक मोर्चासाठी अभूतपूर्व संख्येने मराठा समाज मुंबईत धडकला. राज्यभरातून मराठा बांधव मंगळवारीच मोठ्या संख्येने मुंबईत दाखल झाले आहेत. मोर्च्यापूर्वी मुंबईतील रस्ते आणि मोर्चा सुरू झाल्यानंतर भगवामय झालेले रस्ते याचे सुंदर फोटो आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी काढले आहे.
मोर्चेकरी मुंबईत दाखल झाल्याने मुंबईतील वातावरण मराठामय झाला आहे. सांगली, सातारा, सोलापूर येथून मराठा बांधव मुंबईत मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. हातात भगवे झेंडे घेत उपनगरांमधून देखील मराठा तरुण मुंबईत दाखल होतो आहे.
भगवे झेंडे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची छायाचित्रे चिकटवलेली शेकडो वाहने मुंबईत मोठ्या प्रमाणात दाखल होतांना दिसत आहेत. एक मराठा, लाख मराठाच्या घोषणा देत, सीएसटी परिसर दणाणून गेला आहे.
मराठा समाजाशिवाय समाजसेवक, संघटना, इतर समाजाकडून अनेक ठिकाणी नाश्ता, पाणी, सरबत, विश्रांतिगृह, स्वच्छतागृहांची सोय करण्यात आली आहे.