Maratha reservation row​ : मराठा आरक्षणावरून (Maratha Reservation) पुन्हा एकदा संभाजीराजे (Sambhaji Raje) आक्रमक झालेयत...ठाकरे सरकार मराठा आरक्षणाच्या संदर्भात कोणतीही ठोस भूमिका घेत नसल्याचा मुद्दा हाती घेत छत्रपती संभाजीराजे यांनी पुढील आंदोलनाची भूमिका जाहीर केली आहे. मराठा आरक्षण आणि समाजाच्या इतर मागण्यांबाबत आज संभाजीराजे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

५ मे २०२१ ला आरक्षण रद्द झालं, त्यानंतर अनेकवेळा आंदोलनं केली, पण कोणतीच मागणी पूर्ण झालेली नाही. आतापर्यंत मी आक्रमक होतो, पण आता मी उद्विग्न झालो आहे, असं सांगत संभाजीराजे यांनी येत्या २६ फेब्रुवारीपासून मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषणाला बसणार असल्याची घोषणा केली आहे. 


आमच्या 5 ते 6 मागण्या आहेत, त्यावर राज्य सरकार काहीच मार्ग काढत नाही, त्यामुळे अखेर आमरण उपोषण पुकरलं असल्याचं संभाजी राजे यांनी म्हटलं आहे.



संभाजीराजे यांच्या काय आहेत मागण्या?
1 : मराठा आरक्षणामुळे २०१४ ते ५ मे २०२१ पर्यंतच्या शासन सेवेत निवड झालेल्या सर्व उमेदवारांना कायमस्वरुपी नियुक्ती द्याव्यात.


2 : ओबीसीच्या धर्तीवर मराठा समाजाला सवलती लागू करा


3 : सारथी संस्थेची कार्यालये प्रत्येक महसुली विभागात सुरु करावीत, त्याअतंर्गत प्रत्येक जिल्ह्यात सारथी संस्थेची उपकेंद्र सुरु करुन त्याठिकाणी शिक्षण, संशोधन आणि प्रशिक्षणाचे उपक्रम राबवावेत, संस्थेला एक हजार कोटींची तरतूद करुन तारादूत प्रकल्प तात्काळ सुरु करावा,


4 :  अण्णासाहेब पाटील महामंडळाला भरघोस निधी मिळावा, लाभार्थी पात्रतेसाठी असलेल्या अटी शिथिल करत  व्याज परताव्याची १० लाख रुपयांची मर्यादा वाढवून ती किमान २५ लाख रुपये करावी


५ : शासनाकडून पंजाबराव देशुख वसतीगृह निर्वाह भत्त दिला जातो, मुंबई, नागपूर पूणे अशा महानगरात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना २ हजार रुपये प्रति महिना दिले जाता ही रक्कम वाढवावी.


शासनाकडून मागासवर्गीय वसतिगृहांच्या धर्तीवर मराठा विद्यार्थ्यांसाठी देखील पहिल्या टप्प्यात किमान प्रत्येक जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी कायमस्वरुपी वसतिगृहांची उभारणी करावी, आरक्षणाचा प्रश्न मा्गी लागेपर्यंत मराठा विद्यार्थ्यांसाठी सर्व शैक्षणिक अभ्यासक्रमांमध्ये सुपर न्यूमररी सीटस निर्माण कराव्या अशी मागणीही संभाजीराजे यांनी केली आहे.