Maratha vs OBC Reservation : तत्कालीन पंतप्रधान व्हीपी सिंग यांनी मंडल आयोग अंमलबजावणीची लाल किल्ल्यावरनं घोषणा केली आणि देशात आरक्षणावरुन (Reservation) मोठं रान पेटलं.. त्याच मंडल आयोगावरुन (Mandal Ayog) इतक्या दशकांनंतर महाराष्ट्रात वाद पेटलाय. कारण ठरलेत मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange). मनोज जरांगेंनी 27%ओबीसी समाजाला आव्हान द्यायची भाषा केली आणि ओबीसी नेते आक्रमक झाले, हिंमत असेल तर मंडल आयोगाला आव्हान देऊन दाखवाच असं प्रतिआव्हान ओबीसी नेत्यांनी दिलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ओबीसी नेत्यांच्या आक्रमक भूमिकेनंतर जरांगेंनी प्रत्युत्तर दिलंय. भुजबळांनी उगाच असे चॅलेंज देऊ नये. त्यांच्या वयाचा आम्ही मान राखतो असं सांगत जरांगेंनी वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केलाय.  मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी मराठा समाजाला आवाहन केलंय...मराठा आरक्षणाबाबत मराठा समाजाने काळजी करू नये. आरक्षणाचं प्रकरण कोर्टात जरी गेलं तरी काही होणार नाही असा विश्वास जरांगेंनी व्यक्त केलाय


दुसरीकडे मराठा आरक्षण अधिसूचनेविरोधात ओबीसी संघटना हायकोर्टात गेल्यात, सगेसोयरे आणि गणगोत शब्दावरून प्रतिज्ञापत्राद्वारे कुणबी दाखले देण्यासाठी काढण्यात आलेल्या अधिसूचनेला ओबीसी संघटनांनी मुंबई हायकोर्टात आव्हान दिलंय. ओबीसी वेलफेयर फाऊंडेशनकडून ऍडव्होकेट मंगेश ससाणेंनी हायकोर्टात याचिका केलीय. संविधानाच्या विरोधात जाऊन सगेसोयरे यांची व्याख्या बदलण्यात येऊ नये अशी भूमिका मांडण्यात आलीय. मराठा आरक्षण अधिसूचनेविरोधात ओबीसी संघटनांनी कोर्टाची लढाई सुरु केलीय तर मोर्चा, आंदोलनाची रणनीती आखलीय.


मराठा आरक्षणाविरोधात ओबीसी संघटना कोर्टात गेल्यात. तर जरांगेंनीही कायदेशीर लढाईची तयारी सुरु केलीय. त्यामुळे मराठा आरक्षण अधिसूचनेचं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.. 


मराठा सर्वेक्षणाच्या नावाखाली दरोडा


मराठा आरक्षणाचं सर्वेक्षणासाठी आल्याचं सांगत दोन दरोडेखोरांनी दिवसाढवळ्या नायब तहसीलदारांच्या घरावर दरोडा घातलाय.. अमरावतीमध्ये हा धक्कादायक प्रकार घडलाय.. चाकूचा धाक दाखवत या दरोडेखोरांनी महिलेला 5लाखांनी लूटलंय.. शहरातील राठी नगर भागात नायाब तहसीलदारांच्या घरावरच दरोडेखोरांनी हा दरोडा घातलाय. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.. या दरोडेखोरांची दृश्य सीसीटीव्हीत चित्रित झालीतं. मात्र दोघांनीही तोंडा रुमाल बांधल्यामुळे त्यांना शोधण्याचं मोठं आव्हान पोलिसांपुढे उभं राहीलंय


भंडाऱ्यात वेगळाच प्रकार
राज्यभरात शिक्षकांच्या मदतीने मराठा सर्वेक्षण करण्यात येत आहे. मात्र, भंडाऱ्यामध्ये धक्कादायक प्रकार समोर आलाय. गोंडेगाव येथे शाळेच्या वेळेत शिक्षक सर्वेक्षणाचं काम करताना दिसत आहेतच, त्याचबरोबर विद्यार्थ्यांनाही सोबत घेऊन फिरत आहेत. याबाबत पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केलीये. तर भंडारा जिल्हा परिषद शिक्षण सभापतींनी तर अजबच युक्तिवाद केलाय. सरकारनेच शिक्षकांना सर्व कामं सोडून सर्वेक्षण करायला सांगितल्याचं ते म्हणाले. तर विद्यार्थ्यांना सर्वेक्षणासाठी घेऊन फिरणाऱ्या शिक्षकांवर चौकशी करून कारवाई करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.