मुंबई: बेस्टच्या कार्यक्रमात आक्षेपार्ह नृत्य करणाऱ्या आणि पैसे उधळणाऱ्या सात कर्मचाऱ्यांना सोमवारी सेवेतून बडतर्फ करण्यात आले. यामध्ये अभिनेत्री माधवी जुवेकर हिचाही समावेश आहे. तर इतर पाच कर्मचाऱ्यांची पदोन्नती रोखण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनाने घेतला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्यावर्षी दसऱ्यानिमित्त वडाळा विभागात बेस्ट कर्मचाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यात बेस्टची कर्मचारी माधवी जुवेकरही सहभागी झाली होती. मेळाव्यामध्ये काही सांस्कृतिक कार्यक्रम झाले. 



यावेळी  नृत्य करत असताना काही बेस्ट कर्मचाऱ्यांनी माधवी जुवेकर अजून एक महिला कर्मचारी नृत्य करत असताना त्यांच्यावर पैसे उधळले. माधवी जुवेकरने तोंडात नोटा धरल्या होत्या हे त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे.


अभिनेत्री आणि बेस्टची कर्मचारी माधवी जुवेकरच्या नृत्यावर बेस्टचे कर्मचारी नोटांची उधळण करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली होती.