फक्त मराठी बोलावं हे संविधान विरोधी- रामदास आठवले
मराठी मुद्द्यावरुन आठवलेंची शिवसेनेवर टीका
नवी दिल्ली : फक्त मराठी बोलावं हे संविधान विरोधी आहे. मराठी बोलणं सक्तीचं करता येणार नाही असे विधान केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री आणि आरपीआय प्रमुख रामदास आठवले यांनी म्हटलंय. शिवसेनेच्या उत्तर भारतीय आणि दक्षिण भारतीयांचे युनिट आहेत. मग ते सगळे मराठी बोलतात का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. मराठी मुद्द्यावरुन शिवसेना राजकारण करत असल्याची टीका त्यांनी केलीय.
लेखिक शोभा देशपांडे आणि शिवसेनेच्या भूमिकेला माझा विरोध असल्याचे आठवले म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांनी उदयनराजेंबद्दल केलेले वक्तव्य चुकीचे असून त्यांच्या विधानाशी मी सहमत नसल्याचे आठवले म्हणाले. सर्वांनाच डोकी आहेत म्हणून बिनडोक म्हणणे चुकीचे असल्याचे ते म्हणाले. शाहू महाराज आणि आंबेडकर वंशजांनी वाद घालू नये. सर्व आरक्षण रद्द करण्याला माझा विरोध असल्याचे आठवले म्हणाले.
एमपीएससी परिक्षा झालीच पाहीजे असे आठवे म्हणाले. एससी आणि एसटी तरूण नोकरीच्या प्रतिक्षेत आहेत. उर्वरित जागांवर मराठा समाजातील तरूण येतात असेही ते म्हणाले.