मुंबई : सध्या सर्व लोक नाताळ आणि सुट्ट्यांमुळे पर्यटक बाहेर पडले आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा निर्बंध लागू करण्यात आलेत....  पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज पुणे दौऱ्यावर... मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वाहतूक कोंडी... इतर महत्वाच्या बातम्या खालील प्रमाणे...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज पुणे दौऱ्यावर आहेत. दुपारी 'आदित्य संवाद' मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी आदित्य ठाकरे शिवसेना आणि युवासेना पदाधिकारी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे मैदानात उतरणार आहेत. आदित्य संवादातून निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडणार आहेत. 


2. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वाहतूक कोंडी पाहायला मिळाली आहे. बोरघाटात पुण्याकडे जाणा-या लेनवर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. आडोशी बोगदा ते खंडाळा पर्यंत वाहनांचा वेग मंदावला आहे. नाताळ आणि सुट्ट्यांमुळे पर्यटक बाहेर पडल्याने वाहतुकीची कोंडी झाली आहे. 



3. ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा निर्बंध लागू करण्यात आलेत. त्यानुसार रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत राज्यात जमावबंदी असेल. या काळात 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येता येणार नाही. याशिवाय लग्नसमारंभ, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय कार्यक्रमांवर पुन्हा एकदा निर्बंध लावण्यात आले आहे. क्षमतेच्या 50 % जास्त लोकांना उपस्थित राहण्यास मनाई करण्यात आलीय.


3. दादरमधील एका पॅथोलॉजी लॅबमधील 12 कर्मचा-यांना कोरोनाची लागण झालीये.. दादर पश्चिमेतील लाल पॅथोलॉजी लॅबमधील हे सर्व कर्मचारी आहेत.. या लॅबच्या पॅन्ट्रीमध्ये काम करणा-या एका मुलाला कोरोनाची लागण झाली. त्यानंतर लॅबमधील सर्व 39 कर्मचा-यांची तपासणी केली असता यातील 12 जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय.. 


4. उत्तर पुणे जिल्ह्यात आज सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात धुके पाहायला मिळत आहे.. शिरूरमध्ये दाट धुक्याची चादर पसरलीये. धुक्यासोबत थंडीचा कडाकाही वाढलाय.. ही थंडी रब्बी पिकांसाठी पोषक ठरणार आहे.


5. मिनीगोवा म्हणून ओळखल्या जाणा-या वसईत दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा ख्रिसमस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे..ख्रिस्ती बांधवांनी यावेळी चर्चमध्ये मोठी गर्दी केली होती..कोवीड नियमांचं पालन करुन उत्सव साजरा करण्यात आला..विरार पूर्वेच्या मनवेल पाडा परिसरात असलेल्या डॉन बोस्को चर्चमध्ये संचारबंदीच्या आधीच हा सण साजरा करण्यात आला.  


6.दुबईहून आलेल्या प्रवाशांना सात दिवसांचं क्वारंटाईन सक्तीचं करण्यात आलंय. ओमायक्रॉन संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय प्रवाशांवर निर्बंध घालण्यासाठी राज्य सरकारने व पालिका प्रशासनाने नियमावली जाहीर केली आहे. खास दुबईहून येणाऱ्या प्रवाशांसाठी आणखी कडक निर्बंध घालण्यात आले आहेत.