डोंबिवली : प्रेम संबंधामुळे लोकं काय करतील आणि काणत्या थराला जातील याचा काही नेम नाही. अशीच एक घटना मुंबईतील डोंबीवली येथे घडली आहे. एका रोमीओला त्याच्या विवाहित प्रेयसीचा राग आला. तेव्हा त्याने आपल्या प्रेयसीच्या मुलीचे अपहरण केले. या महिलेने आपल्या प्रियकराविरूद्ध पोलिसांत तक्रार दिली. तक्रारीनंतर पोलिसांनी त्या महिलेच्या मुलीचे अपहरण करणारा प्रियकर शोधून काढला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डोंबिवली पूर्वेमध्ये राहणाऱ्या या महिलेची दिनेश तिवारी नावाच्या व्यक्तीशी मैत्री झाली. ही मैत्री हळूहळू प्रेमात बदलली. पण या महिलेचे लग्न झाले होते. महिलेला दोन मुली आहेत. पण त्या महिलेच्या डोक्यात प्रेमाचे भूत होते. तिने आपल्या पतीचा आणि मुलींचा विचार न करता आपले कुटुंब सोडले आणि आपल्या प्रियकराबरोबर राहायला गेली.


काही दिवस एकत्र राहिल्यानंतर महिलेचे आणि तिच्या प्रियकराचे रोज भांडणं सुरू झाले. अशा परिस्थितीत ती स्त्री तिच्या प्रियकराला कंटाळून त्याचे घर सोडुन आपल्या पतीकडे परत आली आणि आपल्या पतीची माफी मागितली. त्यानंतर तिच्या पतीने तिला स्वीकारले आणि ती आपल्या पती आणि मुलांबरोबर राहू लागली.


आपल्या प्रियकरासोबत जाण्यास तयार नव्हती महिला


आपल्या प्रेयसीपासून लांब रहाणे असहाय्य झाले तेव्हा, एक दिवस तो प्रियकर त्याच्या प्रेयसीच्या घरी पोहोचला आणि तिला त्याच्याबरोबर येण्याचा आग्रह केला.  परंतु प्रेयसी नवऱ्याला सोडण्यास तयार नव्हती. यामुळे प्रियकर दिनेश तिवारी संतप्त झाला. त्याने प्रेयसीला धडा शिकवण्याचा विचार केला. त्याने  प्रेयसीच्या मुलीचे अपहरण करण्याचा कट रचला. एक दिवस महिलेची तीन वर्षाची मुलगी घराबाहेर खेळत असताना दिनेश तिवारीने तिला चॉकलेट देण्याच्या मोहात पाडले आणि पळवून नेले.


महिलेने रिपोर्ट नोंदवला


सर्वत्र शोध घेतल्यानंतरही महिलेला आपली मुलगी सापडली नाही, तेव्हा महिलेने तिच्या प्रियकरावर संशय घेतला. तिने पतीसह मानपाडा पोलिस ठाण्यात जाऊन तिचा प्रियकर दिनेश तिवारी याच्याविरूद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास सुरू केला. सुमारे सहा तासांच्या प्रयत्नांनंतर पोलिस अधिकारी श्री कृष्णा गोरे यांच्या नेतृत्वात पोलिसांनी आरोपीला शोधून काढले आणि त्याला पकडले. पोलिसांनी आरोपीकडून महिलेच्या तीन वर्षाच्या मुलीलाही ताब्यात घेऊन महिलेच्या स्वाधीन केले.