मुंबई : मध्य रेल्वेच्या मशीद स्थानकातील पादचारी पूल दुरुस्तीच्या कामासाठी रविवारी सहा तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक काळात मशीद स्थानक इथल्या मध्य रेल्वेच्या दोन्ही मार्गावरील आणि हार्बरच्या दोन्ही मार्गावरील धिमी वाहतूक सकाळी १०.३० ते दुपारी ४.३० वाजेपर्यंत पूर्णत: बंद राहील. या कालावधीत मध्य रेल्वेची धिम्या मार्गावरील वाहतूक भायखळा स्थानकापर्यंत व हार्बर मार्गावरील वाहतूक वडाळा रोड स्थानकापर्यंतच सुरू राहील. मध्य व हार्बर मार्गावर याशिवाय कोणताही ब्लॉक घेण्यात येणार नाही.


प्रवाशांना त्रास 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ब्लॉक कालावधीत सँडहर्स्ट रोड, मशीद स्थानकात कोणतीही लोकल थांबणार नाही. त्यामुळे प्रवाशांना प्रवासादरम्यान त्रास होणार आहे.


दुसरीकडे पश्चिम रेल्वेवर रविवारी कोणताही मेगाब्लॉक नसेल.


मात्र पश्चिम रेल्वेच्या वसई रोड व विरार स्थानकांदरम्यान शनिवारी मध्यरात्री साडेबारा ते रविवारी पहाटे साडेचार वाजेपर्यंत ४ तासांचा ब्लॉक घेण्यात येईल.


या कालावधीत डाउन धिम्या मार्गावरील वाहतूक डाउन जलद मार्गावर वळविण्यात येईल.