Matheran Toy Train: थंडीत  माथेरानला फिरायला जाणाऱ्या पर्यटकांची संख्या खूप मोठी असते. मुंबई, पुण्यासह राज्यातील विविध भागातून या थंड हवेच्या ठिकाणी येत असतात. मुंबईपासून सुमारे 100 किमी अंतरावर असलेले एक छोटेसे हिल स्टेशन आहे. त्याबद्दल पर्यटकांमध्ये प्रचंड आकर्षण आहे. इथली टॉय ट्रेन लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. महाराष्ट्रातील नेरळ ते माथेरान दरम्यान ही टॉय ट्रेन पुन्हा एकदा सुरू होणार आहे. नेरळ-माथेरान दरम्यान या टॉय ट्रेनची सेवा 4 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. मध्य रेल्वेने नेरळ-माथेरान नॅरोगेज मार्गावरील सेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. 


(अ) नेरळ - माथेरान - नेरळ मिनी ट्रेन सेवा:


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेरळ-माथेरान डाऊन ट्रेन
पहिली 52103 ही ट्रेन नेरळवरुन सकाळी 08.50 वाजता निघेल आणि माथेरानला 11.30 वाजता पोहोचेल. दुसरी 52105 ट्रेन नेरळवरुन सकाळी 10.25 वाजता निघेल ती  माथेरानला 13.05 वाजता पोहोचेल. ही ट्रेन दररोज असते.


माथेरान-नेरळ अप ट्रेन


पहिली ट्रेन 52104 माथेरानवरुन दुपारी 2.45 ला निघेल आणि संध्याकाळी 5.30 वाजता नेरळ स्टेशनला पोहोचेल. दुसरी 52106 ट्रेन माथेरानवरुन संध्याकाळी 4 वाजता निघेल ती नेरळ स्थानकावर संध्याकाळी 6 वाजून 40 मिनिटांनी पोहोचेल. 


52103/52104 एकूण 6 डब्यांची असून त्यात 3 द्वितीय श्रेणी, एक विस्टाडोम कोच आणि 2 द्वितीय श्रेणी कम लगेज अशी व्यवस्था असेल. 


52105/52106 एकूण 6 डब्यांसह 3 द्वितीय श्रेणी, एक प्रथम श्रेणी कोच आणि 2 द्वितीय श्रेणी कम लगेज व्हॅनसह धावेल.


(ब) अमन लॉज – माथेरान – अमन लॉज शटल सेवा (सुधारित वेळा)


माथेरान - अमन लॉज शटल सेवा (दैनिक)


1. 52154 माथेरान 08.20 वाजता निघेल तर अमन लॉज येथे 08.38 वाजता येथे पॉहोचेल
2. 52156 माथेरान 09.10 वाजता प्रस्थान, अमन लॉज 09.28 वाजता आगमन
3. 52158 माथेरान 11.35 वाजता प्रस्थान, 11.53 वाजता अमन लॉज येथे आगमन
4. 52160 माथेरान 14.00 वाजता प्रस्थान अमन लॉज 14.18 वाजता
5. 52162 माथेरान 15.15 वाजता प्रस्थान 15.33 वाजता अमन लॉज येथे आगमन
6. 52164 माथेरान 17.20 वाजता प्रस्थान, अमन लॉज 17.38 वाजता आगमन
(शनिवार/रविवारी)
7. स्पेशल-2 माथेरानला 10.05 वाजता निघते आणि 10.23 वाजता अमन लॉजला पोहोचते.
8. स्पेशल-4 माथेरानहून 13.10 वाजता निघते आणि अमन लॉज येथे पोहोचते. 13.28 वाजता


अमन लॉज - माथेरान शटल सेवा (दैनिक)
1. 52153 अमन लॉज 08.45 वाजता प्रस्थान, माथेरान येथे 09.03 वाजता आगमन
2. 52155 अमन लॉज 09.35 वाजता प्रस्थान, माथेरान 09.53 वाजता आगमन
3. 52157 अमन लॉज 12.00 वाजता प्रस्थान माथेरान 12.18 वाजता आगमन
4. 52159 अमन लॉज 14.25 वाजता प्रस्थान, माथेरान 14.43 वाजता आगमन
5. 52161 अमन लॉज 15.40 वाजता प्रस्थान, माथेरान 15.58 वाजता आगमन
6. 52163 अमन लॉज 17.45 वाजता प्रस्थान माथेरान 18.03 वाजता


माथेरानला शनिवार आणि रविवारी जाण्याचा प्लान करत असाल तर तुम्हाला पुढील वेळापत्रक पाहावे लागेसय
7. विशेष-1 ट्रेन अमन लॉज येथून 10.30 वाजता निघेल तर माथेरानला 10.48 वाजता पोहोचेल.
8. स्पेशल-3 टॉय ट्रेन अमन लॉज येथून 13.35 वाजता ती माथेरानला 1.53 वाजता पोहोचेल.