घाटकोपरच्या मातोश्री रमाबाई ठाकरे प्रसुतीगृहाची दुर्दशा
मुंबईतल्या घाटकोपर पश्चिमेला असलेल्या मातोश्री रमाबाई ठाकरे प्रसुतीगृह इमारतीची दुरावस्था झाली आहे. पाच मजल्यांची ही इमारत १९९६ मध्ये बांधली गेली.
मुंबई : मुंबईतल्या घाटकोपर पश्चिमेला असलेल्या मातोश्री रमाबाई ठाकरे प्रसुतीगृह इमारतीची दुरावस्था झाली आहे. पाच मजल्यांची ही इमारत १९९६ मध्ये बांधली गेली.
मधल्या काळात तिची डागडुजीही केली गेली. मात्र अवघ्या २० वर्षांतच तिची अशी दुर्दशा का झाली असा सवाल स्थानिक विचारत आहे.
घाटकोपरमधल्या साईसिद्धी इमारत दुर्घटनेनंतर, हे रुग्णालय रिकामं करुन इथल्या रुग्णांना इतरत्र हलवण्यात आलं आहे.