मुंबई : राज्यातील बहुतांश भाग दुष्काळाच्या छायेत असताना, नोव्हेंबर महिना सुरू झाल्यानंतर पुन्हा पाऊस येण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. मध्य-महाराष्ट्रातील काही भागात पावसाची शक्यता  वर्तवण्यात आली आहे. यामुळे ऐन दिवाळीत पाऊस येण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा पाऊस आला, तर याचा काढणीला आलेल्या ज्वारी, बाजरी पिकाला आणि कापसाला फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कर्नाटकाजवळ असलेल्या एका कमी दाबाच्या पट्ट्यामुळे ४ आणि ५ नोव्हेंबर रोजी मध्य-महाराष्ट्रातील पुणे, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यांतील काही भागात मेघ-गर्जनेसह पावसाची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तविली आहे. 


या हवामानाच्या स्थितीचा काही परिणाम सातारा आणि औरंगाबाद जिल्ह्यांत दिसून येईल. परंतु या दोन्ही जिल्ह्यांत सार्वत्रिक आणि चांगल्या पावसाची शक्यता नाही. 


या दरम्यान उर्वरित मध्य-महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि पश्चिम-विदर्भात आभाळी वातावरण दिसून येईल. या स्थितीमुळे किमान तापमानात वाढ होईल आणि हवेतील गारवा कमी होईल.