मुंबई : संपूर्ण देशभरात रक्षाबंधनाचा सण आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. हा सण म्हणजे, बहिण-भावाच्या अतूट नात्याचा सण. बहीण आपल्या भावाच्या दिर्घायुष्यासाठी भावाच्या हातावर राखी बांधते. असंच कृतज्ञता जपत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना राखी बांधत रक्षाबंधनाचा दिवस साजरा केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई च्या महापौर किशोरी पेडणेकर या रक्षाबंधनाच्या निमित्ताने कस्तुरबा रुग्णालयात उपस्थित होत्या. रक्षाबंधनाच्या कार्यक्रमासाठी त्यांनी रूग्णालयात उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांनी फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना राखी बांधत आजचा सण साजरा केला आहे.


कस्तुरबा रुग्णालय अधीक्षक चंद्रकांत पवार यांना महापौरांनी राखी बांधली. याशिवाय नर्स, डॉक्टर, वॉर्ड बॉय आणि सुरक्षारक्षक यांनाही राखी बांधत सण साजरा केला. गेल्या वर्षभरापासून कोरोनाच्या कठीण काळात या सर्वांनी मोलांचं योगदान दिलं आहे. यानंतर आज रक्षाबंधनाच्या दिवशी महापौरांनी कृतज्ञता जपली आहे.


रक्षाबंधनानिमित्ताने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. सर्व देशवासियांना रक्षाबंधनाच्या पावन पर्वाच्या खूप शुभेच्छा, असं ट्विट मोदींनी केलं आहे. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.