मुंबई : चेन्नई येथील इंटिग्रेटेड कोच फॅक्टरी इथे तयार झालेली नवीन लोकल मध्य रेल्वेच्या ताफ्यात दाखल होणार आहे. मेधा असं या लोकलचं नाव आहे. यामुळे येत्या काही दिवसांत मध्य रेल्वे च्या हार्बर मार्गावरील प्रवाशांना या नव्या लोकल मधून प्रवास करता येणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या लोकलची किंमत ४३ कोटी रुपये आहे. मेधा बनावटीच्या या नवीन लोकलची क्षमता ताशी ११० किलोमीटर प्रति तास इतकी आहे. हैद्रराबादच्या भारतीय कंपनीने या लोकलमधील इलेक्ट्रॉनिक कंट्रोल यंत्रणा तयार केल्यामुळे या लोकलला ‘मेधा’ असे ओळखले जाते. बंबार्डिअर लोकलच्या धर्तीवर मेधा लोकलची बांधणी करण्यात आली आहे. मार्च अखेर १३ नवीन लोकल मध्य रेल्वेत दाखल होणार आहे.


हार्बर मार्गावर नव्या लोकल येणार असल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. प्रवाशांचा प्रवास आणखी सुखकर होणार आहे. तसेच लोकलची संख्या वाढणार असल्याने गर्दीलाही आळा बसणार आहे.