मुंबई : राज्यातील घडामोडींवर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाल्या आहेत. यातच आज सकाळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar ) यांची सिलव्हर ओकवर भेट घेतली. मात्र, ही खासगी भेट असल्याचे सांगण्यात येत असले तरी राजकीय चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. तसेच शरद पवार यांनीही राज्याचे गृहमंत्री  दिलीप वळसे-पाटील ( Dilip Walse-Patil) यांची भेट घेतली.  यावेळी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे हेही उपस्थित होते. दरम्यान, या भेटीगाठीनंतर राजकीय चर्चांना उधाण आले आहे. (Meet of Sharad Pawar - Sanjay Raut - Dilip Walse-Patil )


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शरद पवार, दिलीप वळसे पाटील आणि मुंबई पोलीस आयुक्त यांच्यातील बैठकीत एनसीबी कारवाई, ड्रग्ज प्रकरणावर चर्चा झाल्याची शक्यता आहे. या सगळ्या प्रकारणातील वस्तुस्थितीची शरद पवार यांनी माहिती घेतली असल्याचे समजते. अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान ड्रग्ज  प्रकरणात खंडणी मागितल्याचा जो आरोप होतोय त्या प्रकरणी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या विरोधात मुंबई पोलिसांच्या एसआयटीने तपास सुरू केला आहे. त्याबाबतही पवार यांनी माहिती घेतल्याचे समजते.


दरम्यान, शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. राऊत हे पवारांना भेटण्यासाठी त्यांच्या मुंबईतील सिलव्हर ओक या निवासस्थानी गेले होते. ही एक सदिच्छा भेट असल्याचे सांगण्यात येत आहे. मुलीच्या लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी गेल्याचे सांगितले जात आहे. मात्र,  यावेळी राजकीय चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. महाविकास आघाडी सरकारची मोट बांधण्यामध्ये संजय राऊत आणि शरद पवार यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. त्यामुळेच ही भेट अनौपचारिक असले तरी शासन आणि प्रशासनासंदर्भातील काही विषयांवर चर्चा बोलले जात आहे. या भेटीच्या बातमीनंतर राजकीय चर्चांना उधाण आले आहे.