दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : राजकीय नेत्यांच्या भेटीचा सिलसिला सुरु झाला आहे. आता एकनाथ खडसेंनी घेतली राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेतली आहे. मुंबईतल्या सिल्व्हर ओक निवासस्थानी भेट खडसेंनी पवारांचीसदिच्छा भेट घेतली. भेटीदरम्यान उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत देखील उपस्थित होते. दोन दिवसांपूर्वी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील पवारांची भेट घेतली. राजकारणात सुरू असलेल्या भेटींच्या चर्चांना उधाण आलं आहे. महत्त्वाचं म्हणजे मंगळवारी फडणवीसांनी जळगावमध्ये खडसेंच्या घरी भेट दिली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

का घेतली खडसेंनी पवारांची भेट
काही दिवसांपूर्वी शरद पवार यांच्यावर शस्त्रक्रिया झाली. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी निवासस्थानी विविध पक्षांचे नेते येत आहेत. आज खडसेंनी देखील पवारांची भेट घेतली. एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. पण विधानपरिषदेची त्यांची आमदारकी लटकलेली आहे. राज्यपालांनी त्यांच्या नावाला मंजुरी दिलेली नाही. त्यामुळे आज त्यांनी याबद्दलचं पवारांची भेट घेतल्याची शक्यता वर्तवली जात आहे. 



तर मंगळवारी देवेंद्र फडणवीस जळगावात गेले होते. पण तेव्हा खडसे मुंबईत असल्यामुळे त्यांची भेट होवू शकली नाही. फडणवीस खडसेंच्या घरी गेल्यामुळे अनेक चर्चा रंगल्या. पण त्यानंतर फडणवीसांनी भेटीचं कारण स्पष्ट केलं. सतत भेटी होत असल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. 


शिवाय फडणवीसांनी पवारांच्या भेटीचं कारण देखील सांगितलं, 'भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसून ही केवळ सदिच्छा भेट होती,' असं देवेंद्र फडणवीस यांनी जालन्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं होतं.