मुंबई: मध्य, हार्बर रेल्वेवर आज मेगाब्लॉक
मुंबई रेल्वेकडून शक्यतो प्रत्येक रविवारी मेगाब्लॉक घेतला जातो.
मुंबई: मध्य आणि हार्बर रेल्वेवर आज (१ जुलै) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी ११ ते सायंकाळी ५ पर्यंत, हार्बरवर स. ११ ते दु. ४ मेगा ब्लॉक असेल. मध्य रेल्वेवरील सर्व लोकल सेवा ब्लॉक कालावधीत सुमारे १० मिनिटे उशिराने धावतील. लांब पल्ल्यांच्या गाड्याही १५ मिनिटांपर्यंत उशिराने धावतील.
शक्यतो प्रत्येक रविवारी मेगाब्लॉक
दरम्यान, मुंबई रेल्वेकडून शक्यतो प्रत्येक रविवारी मेगाब्लॉक घेतला जातो. मेगाब्लॉक कालावधीत रेल्वे रूळ, फलाटावरील कामे, तसेच, इतर काही तांत्रिक कामे पूर्ण केली जातात.
प्रवाशांना नेहमीचाच त्रास
दरम्यान, साप्ताहिक सुट्टीचा दिवस असल्याने मुंबईकर घराबाहेर पडू इच्छितात. पण, नेमका सुट्टीच्या दिवशीच मेगाब्लॉक असल्याने मुंबईकर आणि इतर प्रवाशांना मेगा ब्लॉकचा त्रास होतो.