मुंबई : मध्य आणि ट्रान्स हार्बर मार्गावर दुरुस्तीसाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या मुलुंड ते माटुंगा दरम्यान अप जलद मार्गावर मेगाब्लॉक असेल. सकाळी ११.१५ ते दुपारी ३.४५ पर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे.


ट्रान्स हार्बर मार्ग


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे-वाशी/नेरूळ अप-डाऊन मार्गावर सकाळी १०.३५ ते दुपारी ४.०७ पर्यंत ब्लॉक घेणार आहे. मेगाब्लॉकच्या काळात काही रेल्वे वेळापत्रकावर परिणाम होईल.


पश्चिम, हार्बरवर ब्लॉक नाही


पश्चिम आणि हार्बर मार्गावर कोणताही ब्लॉक असणार नाही. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.