मध्य आणि हार्बर रेल्वेवर आज मेगाब्लॉक, 6 दिवस `या` लोकल रद्द
मुंबईतील लोकल सेवा `लाइफलाइन` म्हणून ओळखली जाते. मुंबईत पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वेची लोकल सेवा आहे. या लोकलमधून दररोज लाखो प्रवासी प्रवास करत असतात. रविवारी अनेकदा लोकल आणि रुळांच्या डागडुजीकरता मेगाब्लॉक केला जातो. आज रविवार 24 डिसेंबर 2023. आज कोणत्या लाइनला मेगाब्लॉक आहे जाणून घ्या.
Sunday Mumbai Local Mega Block : मुंबईतील लोकल सेवा 'लाइफलाइन' म्हणून ओळखली जाते. मुंबईत पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वेची लोकल सेवा आहे. या लोकलमधून दररोज लाखो प्रवासी प्रवास करत असतात. रविवारी अनेकदा लोकल आणि रुळांच्या डागडुजीकरता मेगाब्लॉक केला जातो. आज रविवार 24 डिसेंबर 2023. आज कोणत्या लाइनला मेगाब्लॉक आहे जाणून घ्या.
मध्य आणि हार्बर रेल्वेवर आज मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवरील माटुंगा – मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. तर हार्बर मार्गावर पनवेल-वाशी अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. तर पश्चिम रेल्वे मार्गावर आज दिवसकालीन कोणताही ब्लॉक नाही. नाताळची सुट्टी लागून आली आहे. 23 डिसेंबर ते 25 डिसेंबर असा लाँग विकेंड आल्यामुळे पर्यटक मुंबईबाहेर गेलेत. पण मुंबईकरांसाठी मेगाब्लॉक अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न आहे.
मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक किती वाजता?
कुठल्या स्थानका दरम्यान - मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक
किती वाजता मेगाब्लॉक - रविवारी सकाळी 11.05 ते दुपारी 3.55 वाजेपर्यंत
मेगाब्लॉकदरम्यान लोकलची स्थिती - सीएसएमटीवरून सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील लोकल माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावरुन धावणार आहेत. तर ठाण्यापुढील जलद लोकल मुलुंडमधून डाऊन जलद मार्गावरुन धावण्यात येणार आहे. ठाणेमधून सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहे. माटुंगामध्ये अप जलद मार्गावर वळवण्यात येणार आहे.
हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक किती वाजता?
कुठल्या स्थानका दरम्यान - पनवेल- वाशी अप आणि डाऊन मार्गावर
किती वाजता मेगाब्लॉक - रविवारी सकाळी 11.05 ते दुपारी 4.05 वाजेपर्यंत
मेगाब्लॉकदरम्यान लोकलची स्थिती - सीएसएमटी – बेलापूर / पनवेल अप आणि डाऊन लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहे. तर ठाणे – पनवेल अप आणि डाऊन लोकल सेवा बंद राहणार आहे. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी – वाशी दरम्यान विशेष लोकल सेवा असणार आहे. ठाणे – वाशी / नेरूळ स्थानकांदरम्यान आणि बेलापूर / नेरूळ आणि खारकोपर स्थानकांदरम्यान लोकल सेवा सुरु राहणार आहेत.
'या' स्टेशनबद्दल मोठी अपडेट
मध्य रेल्वे मार्गावरील खोपोली स्टेशनबद्दल मोठी अपडेट आहे. खोपोली – कर्जत शेवटची लोकल 6 दिवसांसाठी रद्द केली आहे. आजपासून 28 डिसेंबरपर्यंत ही शेवटची लोकल धावणार नाही. कर्जत – खोपोली दरम्यानच्या 15 किमी मार्गावरून ताशी 60 किमीऐवजी 90 किमी वेगाने लोकल चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे यासाठी पायाभूत सुविधानसाठी यासाठी पळसधरी – खोपोली अप आणि डाऊन मार्गावर तीन तासांचा ब्लॉक असणार आहे. हा ब्लॉक रात्री 1.25 ते पहाटे 4.25 वाजेपर्यंत असणार आहे. त्यामुळे खोपोलीहून रात्री 12.30 वाजता सुटणारी आणि रात्री 12.55 वाजता कर्जतमध्ये पोहोचणारी खोपोली – कर्जत लोकल ब्लॉकदरम्यान 6 दिवसांसाठी असणार आहे. या सहा दिवसांमध्ये सीएसएमटीमधून रात्री 10.28 वाजता खोपोलीला जाणारी शेवटची लोकल असणार आहे.