मुंबई : रविवारी बाहेर जाण्याचा तुम्ही प्लान बनवला असेल तर कदाचित तुमच्या आनंदावर विरजण पडण्याची शक्यता आहे. कारण मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर उद्या मेगाब्लॉक असणार आहे. रविवारी मध्य आणि हार्बर मार्गावर हा मेगाब्लॉक असणार आहे. रविवार असल्यामुळे लोकलची संख्या काही प्रमाणात कमी असणार आहे. 


कसा असेल मेगाब्लॉक


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

5 जून म्हणजेच रविवारी मध्य रेल्वे, मुंबई विभागाकडून विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी आपल्या उपनगरीय विभागांवर मेगा ब्लॉक घेण्यात आला येणार आहे.  


माटुंगा - मुलुंड अप आणि डाउन जलद मार्ग सकाळी 11.05 ते दुपारी 03.55 पर्यंत  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईतून सकाळी 10.25 ते दुपारी 3.35 या वेळेत सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. 


सकाळी 10.50 ते दुपारी 3.46 पर्यंत ठाण्याहून सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड आणि माटुंगा दरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येईल.  


पनवेल- वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 4.05 वाजेपर्यंत आणि सकाळी 10.33 ते दुपारी 3.49 वाजेपर्यंत पनवेलहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे  सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईहून सकाळी 9.45 ते दुपारी 3.12 या वेळेत पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. 
 
सकाळी 11.02 ते दुपारी 3.53 वाजेपर्यंत पनवेलहून ठाण्याकडे सुटणाऱ्या अप ट्रान्सहार्बर  मार्गावरील सेवा आणि सकाळी 10.01 ते दुपारी 3.20 वाजेपर्यंत ठाण्याहून पनवेलकडे  सुटणाऱ्या डाऊन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.


ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-वाशी भागावर खास लोकल धावतील. ब्लॉक कालावधीत ठाणे – वाशी/नेरूळ दरम्यान ट्रान्सहार्बर मार्गावरील उपनगरीय सेवा सुरू राहतील. ब्लॉक कालावधीत बेलापूर/नेरूळ - खारकोपर दरम्यान उपनगरीय सेवा सुरू राहतील.