मुंबई : मध्य रेल्वे मार्गावरील कुर्ला ते सायन स्थानकांदरम्यान रोड ओव्हर पुलाचा गर्डर टाकण्यासाठी शनिवार आणि रविवारी रात्री ब्लॉक घेण्यात आला आहे. माटुंगा ते कुर्ला दरम्यान अप आणि डाउन धिम्या-जलद मार्गावर रात्री 1 ते पहाटे 4 वाजेपर्यत गर्डरचे काम करण्यात येणार आहे.परिणामी डाउन मार्गावरील  रात्री 12.18 आणि 12.31 ची सीएसएमटी ते ठाणे-कुर्ला लोकल, अप मार्गावरील कुर्ला ते सीएसएमटी प.5.54 ची लोकल रद्द करण्यात आलेली आहे. शनिवारी  रात्री 11.12 ची कल्याण-सीएसएमटी लोकल कुर्ला स्थानकापर्यतच चालविण्यात येणार आहे. तर अंबरनाथ-सीएसएमटी रा.10.01 ची लोकल ठाणे स्थानकापर्यत धावणार आहे.


या गाड्यांना लेटमार्क


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

51034 साईनगर शिर्डी-सीएसएमटी, 51208 पंढरपूर-सीएसएंमटी, 12134  मॅगलोर-सीएसएमटी एक्स्प्रेस रविवारी आणि सोमवारी दादर स्थानकापर्यतच चालविण्यात येणार आहेत. 11028 चैन्नई-सीएसएमटी मुंबई मेल, 11020  भुवनेश्वर-सीएसएमटी कोणार्क एक्स्प्रेस, 11058  अमृतसर-सीएसएमटी एक्स्प्रेस, 16382  कन्याकुमारी-सीएसएमटी एक्सप्रेस, 12702 हैद्राबाद-सीएसएमटी हुसेनसागर एक्सप्रे, 11140  गडग-सीएसएमटी एक्स्प्रेस, 12810  हावडा-मुंबई मेल व्हाया नागपूर, 11402  नागपूर-सीएसएमटी नंदिग्राम एक्स्प्रेस या गाड्यांना रविवार आणि सोमवारी लेटमार्क बसणार आहे.


आसनगाव ते कसारा लोकल वाहतूक बंद


आसनगाव ते कसारा दरम्यान ओव्हरहेड वायरचे जाळे आणि पादचारी पुलाचा गर्डर टाकण्याकरिता  रविवारी  सकाळी 10.50 ते दु.12.50 वाजेपर्यंत  अप-डाउन मार्गावर पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक दरम्यान आसनगाव ते कसारा दरम्यानची अप-डाउन मार्गावरील लोकल वाहतूक बंद असणार आहे. सीएसएमटी-कसारा स.9.41,स.10.16ची लोकल आसनगाव पर्यतच धावणार आहे. कसारा-सीएसएमटी स.11.12,दु 12.19 च्या लोकल आसनगाव स्थानकातुन अनुक्रमे स.11.49,दु.12.56 वाजता चालविण्यात येणार आहेत. रविवारी 51153-54 मुंबई-भुसावळ-मुंबई पॅसेंजर, 12117-18  एलटीटी-मनमाड-एलटीटी गोदावरी एक्सप्रेस रद्द केलेल्या आहेत. 11026  पुणे-भुसावळ एक्सप्रेस दौण्ड-मनमाड मार्गे धावणार आहे.


मध्य रेल्वेच्या या लोकल रद्द


तसेच  मध्य रेल्वेच्या कर्जत स्थानकातील प्लॅटफॉर्म 1 वरील झाड तोडण्यासाठी रविवारी स.10.40 ते दु.1.40 दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक दरम्यान ठाणे-कर्जत स.10.48,दु.12.05,कर्जत-ठाणे दु.1.27 अणि कर्जत-सीएसएमटी दु.1.57 ची लोकल रद्द करण्यात आलेल्या आहेत. सीएसएमटी-कर्जत स.9.01,स.9.38,स.10.36,स.11.15 ची लोकल भिवपुरी स्थानकापर्यतच धावणार आहेत. तसेच कर्जत-सीएसएमटी स.10.45,स.11.19,दु.12.21,दु 1 वाजताच्या लोकल भिवपुरी स्थानकातून अनुक्रमे स.10.54,स.11.28,दु.12.30,दु.1.09 वाजता चालविण्यात येणार आहेत. 


हार्बरवर कुर्ला-वाशी दरम्यान ब्लॉक


तसेच  उपनगरीय रेल्वेच्या देखभाल-दुरुस्तीकरिता रविवारी 17 मार्च रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मात्र हा ब्लॉक मेन लाईनवर घेण्यात येणार नाही.  हार्बर मार्गावर कुर्ला-वाशी दरम्यान अप-डाउन मार्गावर स.11.10ते दु.3.40 वाजेपर्यत ब्लॉक चालणार आहे . प्रवाशांची गैरसोय होऊ नये  यासाठी पनवेल-वाशी,कुर्ला-सीएसएमटी दरम्यान विशेष लोकल चालविण्यात येणार आहे.


पश्चिम रेल्वेवर जम्बोब्लॉक 


तर पश्चिम रेल्वेवर बोरीवली ते गोरेगाव दरम्यान अप-डाउन धिम्या मार्गावर स.10.35 ते दु.3.35 वाजेपर्यत जम्बोब्लॉक घेणार आहेत.  या ब्लॉकदरम्यान धिम्या मार्गावरील वाहतुक जलद मार्गावर वळविण्यात येणार आहे . परिणामी अप-डाउन मार्गावरील काही गाड्या रद्द करण्यात आले आहेत.