मुंबईत तिन्ही मार्गावर आज मेगाब्लॉक
उपनगरीय रेल्वेच्या तिन्ही मार्गावर आज मेगाब्लॉक घेण्यात आलाय.. यामध्ये मध्य रेल्वेवर अप जलद मार्गावर कल्याण ते ठाणे स्थानकादरम्यान, हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी तर पश्चिम रेल्वेवर बोरिवली ते नायगाव स्थानकादरम्यान मेगाब्लॉक घेण्यात आलाय.
मुंबई : उपनगरीय रेल्वेच्या तिन्ही मार्गावर आज मेगाब्लॉक घेण्यात आलाय.. यामध्ये मध्य रेल्वेवर अप जलद मार्गावर कल्याण ते ठाणे स्थानकादरम्यान, हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी तर पश्चिम रेल्वेवर बोरिवली ते नायगाव स्थानकादरम्यान मेगाब्लॉक घेण्यात आलाय.
मध्य रेल्वेवर सकाळी ११.१५ ते दुपारी ४.१५ पर्यंत कल्याण ते ठाणे स्थानकादरम्यान अप जलद मार्गावर ब्लॉक असणार आहे. हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० पर्यंत अप आणि डाऊन दोन्ही मार्गावर दुरुस्ती कामे हाती घेण्यात येणार आहेत.
तर पश्चिम रेल्वेवर सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत बोरिवली ते नायगाव स्थानकादरम्यान जम्बो मेगाब्लॉक घेण्यात आलाय. ब्लॉक दरम्यान विरार-वसई ते बोरिवली-गोरेगाव दरम्यान अप आणि डाऊन धिम्या मार्गावरील वाहतूक अप व डाऊन जलद मार्गावरून चालवण्यात येईल.