मुंबई : मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मात्र पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक नसल्याने पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मध्य रेल्वेवर मुलुंड ते माटुंगा दरम्यान उद्या सकाळी साडेअकरा ते दुपारी साडेचार वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तर ठाण्याहून सुटणाऱ्या अप स्लो मार्गावरील वाहतूक 11 ते दुपारी 4.30 वाजेपर्यंत अप फास्ट मार्गावरून चालवण्यात येणार आहे. तर सीएसएमटीहून सुटणाऱ्या डाऊन फास्ट लोकल्सना घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड स्थानकांत थांबा देण्यात येईल. 


हार्बरवर कुर्ला ते वाशीदरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर सकाळी 11 ते दुपारी 4.15 वाजेपर्यत दुरुस्तीची कामांसाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते वाशी, बेलापूर, पनवेल अप-डाऊन लोकल खंडीत राहतील. मात्र, प्रवाशांच्या सोयीसाठी सीएसएमटी ते कुर्ला आणि वाशी ते पनवेल स्थानकांदरम्यान विशेष फे-या चालवण्यात येणार आहेत.