Mumbai Local News : मुंबईकरांनो पोरांना उन्हाळ्याची सुट्टी लागली आहे आणि त्यात आज रविवार आहे. म्हणजे तुम्हालाही सुट्टी आहे. अशात जर तुम्ही आज बाहेर जाण्याचा प्लॅन केला असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. रविवारच्या दिवशी मेगाब्लॉक (Mega Block on Sunday) घेण्यात येतो. मग तुम्हाला नाहक त्रास होऊ नये म्हणून घराबाहेर पडण्यापूर्वी जाणून घ्या कुठल्या मार्गांवर, कधी आणि किती वेळेसाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईकरांनो आज रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.  माटुंगा ते मुलुंड आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी/वांद्रे मार्गावर मध्य रेल्वेकडून ब्लॉक असणार आहे. पश्चिम रेल्वेकडून जोगेश्वरी ते सांताक्रुझदरम्यान मेगाब्लॉक असून काही लोकलच्या फेऱ्याही रद्द करण्यात आल्या आहेत. तर हार्बर मार्गावर CSMT ते कुर्ला दरम्यान ब्लॉक आहे. (megablock on Sunday 30 April all 3 routes Mumbai Local Train Latest Update)


सेंट्रल मार्गावर मेगाब्लॉक कधी आणि किती वेळ असणार? (Megablock on Central Road)


सेंट्रल मार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी जाणून घ्या की आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस माटुंगा आणि मुलुंड मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या मार्गावरुन सकाळी  10.25 ते दुपारी 3.35 वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाउन जलद मार्गावर धावणाऱ्या लोकल धीम्या मार्गावर धावणार आहेत. मुलुंडनंतर लोकल नियोजित थांब्यांवर थांबणार आहे. मात्र नंतर लोकल ठाण्याहून पुढे डाउन जलद मार्गावर पुन्हा वळवण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईकरांनो सेंट्रल वेळावर आज लोकल 15 ते 20 मिनीटे उशीराने धावणार आहेत.


हार्बर मार्गावर मेगाब्लॉक कधी आणि किती वेळ असणार? (Megablock on Harbor Road)


छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-चुनाभट्टी ते वांद्रे डाउन हार्बर मार्गावर सकाळी 11.40 ते सायंकाळी 4.40 पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. तर चुनाभट्टी ते वांद्रे-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते सायंकाळी  4.10 पर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वडाळा रोड दरम्यान सकाळी  11.16 ते सायंकाळी  4.47 ब्लॉक असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वडाळा रोडवर सकाळी 10.48 ते सायंकाळी  4.43 वाजेपर्यंत सर्व सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. 


पनवेलसाठी विशेष लोकल


पनवेल/बेलापूर/वाशी याठिकाणाहून सकाळी 9.53 ते दुपारी 3.20 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणारी सेवा पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे. त्याशिवाय  गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी 10.45 ते सायंकाळी 4.13 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. 


मात्र या मेगाब्लॉक काळात पनवेल ते कुर्ला या मार्गावर विशेष लोकल सोडण्यात येणार आहे. कुर्ला रेल्वेस्थानकातून प्लॅटफॉर्म क्र. 8 वरुन पनवेलसाठी दर 20 मिनिटांनी विशेष लोकल सोडण्यात येणार आहे. तर आज मेगाब्लॉकमुळे हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी  10.00  ते संध्याकाळी 6.00 वाजेपर्यंत मेन लाइन आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करता येणार आहे. 


पश्चिम रेल्वे मेगाब्लॉक कधी आणि किती वेळ असणार? (Western Railway Megablock)


पश्चिम रेल्वे मार्गावर जोगेश्वरी ते सांताक्रुझ दरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे. या मार्गावरील काही लोकल फेऱ्या या रद्द करण्यात आल्या आहेत. तर लोकल मेगाब्लॉक काळात विलंबाने धावणार आहेत.