वसई : मध्य रेल्वेचा दुर्लक्षित प्रवासी मार्ग असलेल्या दिवा-वसई रोड आणि दिवा-पनवेल-रोहा मार्गावरील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. आजपासून पेण-पनवेल मार्गावर मेमू लोकल धावणार आहे. पेण इथून रविवारी अकरा वाजता सुटणारी मेमू पनवेलला ११ वाजून ५५ मिनिटांनी पोहचणार आहे. ही मेमू हमरापूर, जिते, आप्टा, रसायनी, सोमाठाणे या रेल्वे स्थानकांवर थांबणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खारकोपर इथं होणाऱ्या संभाव्य कार्यक्रमात व्हिडीओ लिंकच्या माध्यमाने पेण-पनवेल मेमूला हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे.


रेल्वेमंत्र्यांची उपस्थिती 


 या कार्यक्रमाला रेल्वेमंत्री पीयूष गोयल उपस्थित राहण्याची शक्यता आहे.


यासोबत दिवा-वसई रोड आणि दिवा-पनवेल-रोहा मार्गावरदेखील मेमू धावणार आहे.


१२ बोगींची मेमू या मार्गावर मार्गस्थ होणार असून, मेमूची देखभाल-दुरुस्तीचे काम कळवा कारशेडमध्ये होणार असल्याचे मध्य रेल्वेच्या कोचिंगच्या विभागाकडून स्पष्ट करण्यात आलंय.